तीसचं टाक... आता बंद होणार!

पंपांवर ५० रुपयांपेक्षा कमी पेट्रोल खरेदी करता येणार नाही, उत्तर महाराष्ट्रात लागू केला निर्णय, येणार अडचणी ; औरंगाबादसह जिल्ह्यातही नियम येण्याची चर्चा
petrol pump
petrol pumpSakal

औरंगाबाद - राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावर पन्नास रुपयांपेक्षा कमी पेट्रोल खरेदी करता येणार नसल्याचा निर्णय लागू केला आहे. असाच नियम आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्यातही लागू करण्यात येणार आहे. याशिवाय पेट्रोल खरेदी करणाऱ्याला पंपाच्या प्रिंटरमधून निघणारी प्रिंट देणे बंधन कारक करण्यात आलेले आहे. यामुळे याचा फटका पंप चालकांसह ग्राहकांनाही सोसावा लागणार आहे. या संदर्भात हा नियम जिल्ह्यात लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. तो लागू होण्याची शक्यताही पेट्रोल डिलर असोसिएशनने वर्तवली आहे.

याबाबत पेट्रोल पंपचालकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अचानक ऑईल कंपनीकडून पेट्रोलच्या खरेदी विक्रीबाबत नवीन दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्यांची गाडी, मोबाईल नंबर टाकून पंपावर असलेल्या प्रिंटरमधून प्रिंट देणे बंधन कारक करण्यात आलेले आहे. या वाढीव कामामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत.

काही ऑईल कंपनीच्या पंपावर असलेल्या प्रत्येक नोजलच्या ठिकाणी कंपनीकडून प्रिंटर देण्यात आलेले नाही. यामुळे दोन नोजल किंवा चार नोजल असलेल्या पंपाचा एकच प्रिंटर आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला पावतीची प्रिंट देण्यासाठी उशिर होत आहे. या नवीन नियमानुसार पन्नास रूपयावरील पेट्रोलसाठी ही सिस्टम आपोआप लागू करण्यात आलेली आहे. यामुळे वीस ते चाळीस रूपयांचे पेट्रोल घेणाऱ्यांची चांगलीच अडचण झालेली आहे. लवकरच मराठवाड्यात ही पध्दत सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंप हे अटोमेटेड आहे. या ठिकाणी टाकीत असलेला माल आणि सध्या विक्रीची ऑनलाईन माहिती कंपन्यांना मिळत असते.

अद्यापतरी औरंगाबादेत अंमलबजावणी नाही

अखिल अब्बास (सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिऐशन) ः उत्तर महाराष्ट्रात पंप विक्रेत्यांसाठी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र औरंगाबादेत ही पद्धत अजून लागू करण्यात आलेली नाही. मात्र या दिशेने हालाचाली सुरु असून हा नियम आपल्याकडे येण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com