पीएम केअरचे बिनकामाचे व्हेंटीलेटर्स पडून, तंत्रज्ञांकडूनही दुरुस्तीही होईना

कंपनीचे वरिष्ठ आले पण दुरूस्ती जैसे थे!
pm modi
pm modipm modi

औरंगाबाद: पंतप्रधान केअर योजनेतून मिळालेले व्हेंटीलेटर्स केवळ घाटीतच नव्हे तर विविध ठिकाणी बिनकामाचे असल्याचे समोर आले आहे. घाटीत आधी अभियंते आले व दुरुस्ती केली पण उपयोग झाला नाही. शुक्रवारी (ता. १४) व्हेंटीलेटर्सशी संबंधित कंपनीचे वरिष्ठ आले पण दुरुस्ती जैसे थे! असून रात्रीपर्यंत व्हेंटीलेटर्स दुरूस्ती झाली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली. पीएम केअरतर्फे सहकार्य म्हणून रुग्णालयांना देण्यात आलेले व्हेंटीलेटर्स जीवाचा खेळ करीत असल्याचेही समोर आले आहे.

पीएम केअरतर्फे औरंगाबादसह ठिकठिकाणी व्हेंटीलेटर्सचे वितरण करण्यात आले आहे. परंतू मागच्या काही दिवसांपासून हे व्हेंटीलेटर्सचे स्थानिक बायोमेडीकल अभियंत्यांनी निरीक्षण व पाहणी केली त्यावेळी बऱ्याच त्रुटी व्हेंटीलेटर्समध्ये दिसून आल्या. काही रुग्णालयांनी तर हे व्हेंटीलेटर्स वापरायोग्य नसल्याचेही निरीक्षण नोंदवत प्रत्यक्ष वापरात घेतले नाहीत. मोठा गाजावाजा करुन पीएम केअरची व्हेंटीलेटर्स नादुरूस्त व दर्जाहिन असल्याचे स्पष्ट होत आहे. घाटी रुग्णालयात दीडशे व्हेंटीलेटर्स देण्यात आली आहेत. परंतू ते अडगळीत असल्यासारखेच आहेत. सबंधित व्हेंटिलेटर कंपनीचे अभियंत्यांनी बुधवारी या व्हेंटीलेटर्सची दुरुस्ती केली परंतू उपयोग झाला नाही.

pm modi
Petrol price: खाद्यतेलापाठोपाठ पेट्रोलही शंभरच्या घरात

सायंकाळपर्यंत नादुरूस्तच
व्हेंटीलेटर्सशी संबंधित कंपनीचे वरीष्ठ घाटीत रुग्णालयात शुक्रवारी आले. त्यांनी आजही व्हेंटीलेटर्स दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. पण त्यांचाही निरुपाय झाला. घाटीत सायंकाळपर्यंत व्हेंटीलेटर्स दुरुस्त झाले नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत व्हेंटीलेटर्स या विषयावर चर्चा झाली, तेव्हा तात्काळ व्हेंटीलेटर्स व देखभाल दूरूस्तीबाबत निर्णय घेण्याचे ठरले पण अजूनही समस्या आहेतच.

कंपनीकडून फारसा प्रतिसाद नव्हता
शहरातील विविध रुग्णालयांना देण्यात आलेल्या व्हेंटीलेटर्सच्या समस्या समोर आल्यानंतर संबंधित रुग्णालयांकडून प्रशासन व कंपनीकडे तक्रारी केल्या; परंतू त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद लाभत नव्हता. कोविडचा काळ व्हेंटीटेर्सअभावी तडफडून मृत्यू होत असताना देखभाल दुरुस्तीबाबत झालेला विलंब हे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

pm modi
पंतप्रधान लातुरच्या शेतकऱ्यांना म्हणाले, बरे आहात ना? काळजी घ्या!

सुटे भाग पुणे-मुंबईला
पीएम केअरकडून व्हेंटीलेटर्स शहरांसह तालुका व ग्रामीण भागातही देण्यात आले आहेत. परंतू तेथे बायोमेडीकल अभियंते उपलब्ध नाहीत. तसेच व्हेंटीलेटर्सचे सुटे भागही पुणे, मुंबईसारख्या शहरात उपलब्ध होतात. त्यामुळे दुरुस्तीलाही वेळ लागत असल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com