चार हजार घरांसाठी केले तीन संस्थांनी सादरीकरण

प्रधानमंत्री आवास योजना : आज निविदा उघडणार
Home
Homeesakal

औरंगाबाद : रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. नऊ) तीन संस्थांनी सादरीकरण केले. गुरुवारी (ता.१०) निविदांच्या फायनान्शियल बीड उघडल्या जाणार आहेत.बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आहे; पण जागेअभावी शहरात या योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीसगाव, पडेगाव, हर्सूल येथे जागा उपलब्ध करून दिली. जागा ताब्यात येताच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने ‘मार्च एंड’पूर्वी प्रकल्पाच्या कामाची निविदा अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे महापालिकेने कामाला गती दिली आहे. योजनेचा डीपीआर तयार करून प्रकल्प उभारणीचे काम करण्यासाठी अल्पमुदतीच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. या कंपन्यांना बुधवारी सादरीकरण केले. त्यात समर्थ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर, जग्वार ग्लोबल या तीन कंपन्यांचा समावेश आहे. समर्थ कन्स्ट्रक्शनने औरंगाबादेतील गंगापूर नगरपरिषदेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचे काम हाती घेतलेले आहे. देवगड, नाशिक, नांदेड, मीरा भाइंदर पालिकांचे डीपीआर तयार करून दिले आहे. इंडो ग्लोबल कंपनीने वणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम केले आहे. जग्वार ग्लोबलने फुलंब्री, नेवासा, परतूर येथील घरकुल योजनांचे डीपीआर तयार करून दिले आहेत.

गुरुवारी निविदांचे फायनान्शियल बिड उघडल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले. मुख्य लेखाधिकारी संतोष वाहूळे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, उप संचालक नगररचना ए. बी. देशमुख उपस्थित होते.

चार हजार घरांचे होऊ शकते काम

महापालिकेला जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत मिळालेल्या जागांची मोजणी करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे तीन ते चार हजार घरांचे बांधकाम होऊ शकते, असा अंदाज आहे. महापालिकेकडे या योजनेअंतर्गत सुमारे ८० हजार जणांनी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com