
औरंगाबाद : मालमत्ताधारकांचा ‘डबल गेम’
औरंगाबाद : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज येथील मालमत्ताधारकांना महापालिकेकडून टीडीआर घेतला आहे. हा टीडीआर विक्रीही करण्यात आला पण अनेकांनी जागा मात्र महापालिकेच्या ताब्यात दिलेली नाही. आता अशा मालमत्ताधारकांविरुद्ध सात फेब्रुवारीपासून कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी दिला.
हेही वाचा: CBSE Term 2 Exam : 10 वी, 12 वी टर्म-2 परीक्षा 4 मे रोजी होणार?
महापालिकेने गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, सराफा, शहागंज भागात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली होती. यावेळी अनेक मालमत्ताधारकांनी तडजोडी करून रस्त्यासाठी महापालिकेला जागा दिल्या. त्यानंतर महापालिकेने अनेकांना टीडीआर स्वरूपात मोबदला दिला. पण काहींनी अद्याप या जागा महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाने दिवाण देवडी व औरंगपुरा भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली. दिवाण देवडी येथील राजेंद्र सिताराम बसैय्ये यांचे (सीटीएस नंबर ५३-२८) पंधरा बाय दहा या आकाराचे दुकान रस्ता बाधित होते. हे दुकान जेसीबीच्या साहाय्याने निष्कसित करण्यात आले. बसैय्ये यांनी या जागेचा टीडीआर स्वरूपात मोबदला घेऊन जागेचा हक्कसोड करारनामा करून दिला होता.
हेही वाचा: Nagpur Municipal Corporation | ठरलं आता कुठून लढायचं ते...
मात्र जागेवरून दुकान हटविले नव्हते. याबाबत महापालिका प्रशासकांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जागा पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र बसैय्ये यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मंगळवारी अतिक्रमण निष्कासित केले. तसेच औरंगपुरा मुख्य बाजारपेठत एकूण १२ दुकानदारांनी वाहतुकीला अडथळा ठरतील अशा लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते. ही अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. यावेळी दोन लोखंडी काऊंटर व पाणीपुरीवाल्याचे काऊंटर जप्त करण्यात आले. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत रामदास भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, रवींद्र देसाई यांच्यासह पथकाने केली. इतर मालमत्ताधारकांना सात फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.
Web Title: Property Owners Took Double Game Tdr Did Not Give Possession Land Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..