IMA: औरंगाबादमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याविरुद्ध निदर्शने

औरंगाबादेतही ‘आयएमए’ हॉल येथे इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद शाखेतर्फे निषेध सभा घेण्यात आली
doctor
doctordoctor

औरंगाबाद: वारंवार होत असणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. १८) देशभरात विविध ठिकाणी निदर्शने झाली. औरंगाबादेतही ‘आयएमए’ हॉल येथे इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद शाखेतर्फे निषेध सभा घेण्यात आली. यानंतर दिवसभर डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.

याप्रसंगी औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी ‘‘डॉक्टरांवरील हल्ले ही दुर्दैवी असून डॉक्टरांना संपत्ती कर, आयकर, पाणीपट्टी अथवा कुठल्याही करांत सवलत मिळत नाही तरीही डॉक्टरांकडून अविरत जनसेवेची अपेक्षा केली जाते. डॉक्टर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु केवळ गैरसमजातून अविरत जनसेवा करणाऱ्या व्यक्तींवर हल्ले करायचे ही मानसिकता बदलायला हवी.’’ सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी ‘‘डॉक्टरांवर हल्ल्याआधी समाजाने त्याचे दूरगामी दुष्परिणामांचा विचार करावा. शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता, काही प्रमाणात अस्वच्छता, अपुरे मनुष्यबळ याचा अप्रत्यक्ष प्रभाव तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मानसिकतेवर पडतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने वार्षिक निधी नियोजनात आरोग्य खात्याला वाढीव निधी देणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

doctor
उस्मानाबादेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घडवले माणुसकीचे दर्शन

‘‘सध्या डॉक्टर-रूग्णाचे नाते संबंध दुष्टचक्रात अडकले. एकमेकांवरील विश्वास वाढवणे ही काळाची गरज आहे. आता समाजाचेही डॉक्टरांसारखे नाते घट्ट विणण्याचा प्रयत्न करायला हवा. डॉक्टरांना देव मानण्यापेक्षा माणूस म्हणून माणुसकी दाखवा. डॉक्टरांवरील हल्ले, त्यांचे मानसिक खच्चीकरण थांबविणे ही गरज आहे, असे उपाध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले.
रुग्णांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून डॉक्टरांना सहकार्य करावे असे महिला उपाध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे म्हणाल्या. तसेच डॉ. राजेंद्र गांधी व डॉ. रमेश रोहीवाल यांनीही मत मांडले. याप्रसंगी सहसचिव डॉ. प्रफुल्ल जटाळे, कोषाध्यक्ष डॉ. हर्मित बिंद्रा, माजी अध्यक्ष डॉ. दत्ता कदम, डॉ. उज्वला झंवर, डॉ. अर्चना भांडेकर, डॉ. अरुण मरवळे, डॉ. मिश्रीकोटकर, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. केदार साने, डॉ. सुनील धुळे, डॉ. कुंदा धुळे, डॉ. गितेश दळवी, डॉ. सागर कुलकर्णी आदी डॉक्टरांनी उपस्थिती लावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com