औरंगाबाद : रेल्वे विकासाला राजकारणाची कीड; महसुलात आठवा तरीही पिटलाइन नाही

२९ व्या स्थानावरच्या जालन्याला होणार पिटलाइन
Railway development suffer through politics aurangabad
Railway development suffer through politics aurangabadesakal

औरंगाबाद : दक्षिण-मध्य रेल्वेच्या महसुलात औरंगाबाद टॉप थर्टीमध्ये म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. प्रचंड प्रवासी आणि प्रचंड महसूल असतानाही औरंगाबादला पिटलाइन होऊ द्यावयाची नाही असा जणू विडाच दक्षिण मध्य रेल्वेने उचलला आहे. त्याला आता राजकारणाचीही कीड लागली आहे. महसुलात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि गैरसोयीच्या जालना शहरात पिटलाइनचा अट्टाहास आहे. खरे तर औरंगाबाद आणि जालना अशा दोन्ही शहरातही पिटलाइन करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्र्यांनी कसब पणाला लावण्याची गरज होती. दुर्दैवाने दोन केंद्रीय मंत्री लाभल्यानंतरही अनास्था कायमच आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या टॉप थर्टी रेल्वेस्थानकाच्या महसुलाची मार्च २०२१ ते फेब्रुवारी २०२२ ची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात पहिल्या दहा स्थानकांत नांदेड (विभागाचे ठिकाण) सहाव्या आणि औरंगाबाद आठव्या क्रमांकावर आहे. जालना शहराचा तब्बल २९ वा क्रमांक आहे. औरंगाबादपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गुंटूर, काकीनाडा, काजीपेट, नरसापूर हे महसुलाच्या यादीत नाहीत तेथेही पिटलाइन आहेत, म्हणजेच महसूल आणि पिटलाइन यांचा काहीही संबध नाही. मात्र, केवळ औरंगाबादला पिटलाइन होऊ नये यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेची नकारात्मक भूमिका आहे. जालना शहराचे उत्पन्न तुलनेने नगण्य असताना, देशाच्या रेल्वे राज्यमंत्र्यांनी पिटलाइन आपल्या मतदारसंघात खेचली. खरे तर औरंगाबादचा मोठा भागही त्यांच्याच मतदारसंघात आहे, मात्र तेवढी प्रगल्भता दाखवण्यात रेल्वेराज्यमंत्री कमी पडले ही नागरिकांची भावना आहे.

चिकलठाण्यात व्हावी पिटलाइन

स्वानंद सोळंके (रेल्वे प्रश्नांचे अभ्यासक) ः दमरेमध्ये औरंगाबाद सातत्याने आपले पहिल्या दहा स्टेशनमधील स्थान कायम राखून आहे. कोरोनाचा फटका बसूनही औरंगाबादने बावन्न कोटी उत्पन्न मिळवून दिले. असे असून देखील औरंगाबादच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला जातो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी औरंगाबाद वरील अन्याय दूर करावा आणि चिकलठाण्यात पिटलाइन मंजूर करून जमीन अधिग्रहणाचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा आहे.

अशी आहे परिस्थिती

स्टेशन प्रवासी संख्या मिळालेला महसूल

१) सिकंदराबाद जं. १,५०,१६,६४० ६७८,२२,०४,४८५

२) विजयवाडा जं. ७४,३१,५८६ २२३,७४,७९,७२२

३) तिरुपती ४६,६८,८३७ १६२,३६,७८,७७२

४) काचिगुडा ३६,९४,१२१ १२४,३५,३९,०२२

५) हैदराबाद २४,००,७७५ १०८,५०,०१,९५५

६) नांदेड ३४,०४,५९१ ८१,७८,६८,८५६

७) राजमुंद्री २०,४०,८१५ ६७,५८,२०,९१२

८) औरंगाबाद २४,५२,५३७ ५२,१५,०६,०४६

९) नेल्लोर १७,२७,०९३ ४५,४२,३४,३४५

१०)गुंटूर जं. २४,३८,११४ ४४,१६,४६,७०९

११)लिंगमपल्ली २२,७८,२४८ ४३,२४,७३,५०२

१२)वरंगल १९,९१,१४१ ३९,०५,२३,१९२

१३)रेणीगुंटा जं. ८,०७,३९० ३४,०५,१०,२१२

१४)ओंगले ११,९३,०२६ ३१,०८,८६,००६

१५)सामलकोट जं. १०,२०,१९१ २९,६३,६८,२३२

१६)काझीपेट जं. १६,०३,१६२ २८,१२,८१,६८६

१७)खम्मम १६,०७,३५२ २७,६२,५२,५१८

१८)काकीनाडा टाऊन ६,७९,३३६ २७,४२,११,३७४

१९)परभणी जं. २०,१८२३२ २४,०७,९३,५२६

२०)निझामाबाद १०,९४,९३७ २२,६८,६२,८६३

२१)गुंटकल जं. ९,०६,८५४ २०,३६,४७,४७७

२२)रायचूर ७,१२,५५९ २०,२४,१८,३७८

२३)अनंतपूर ७,२९,९९७ १९,१३,३३,२९७

२४)तेनाली जं. १०,२६,०४८ १७,५०,६०,१३०

२५)एलुरू ७,८२,४२२ १६,८७,६४,५३०

२६)चुडपळ ५,८४,०८९ १६,७९,७६,९६१

२७)गुडूर ५,३७,८३७ १६,५६,६८,७५७

२८)भीमवरम टाऊन ५,७०,८०७ १६,२७,०४०१६

२९)जालना ९,१५,३७० १५,२५०२,३२७

३०)अनकपल्ले ८,६६,२८० १४,२०,७६,६१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com