भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून दानवेंना चकवा; केणेकर, अतुल सावे, औताडे यांचे नाव

औरंगाबादेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला गॅस पाईप लाईनच्या उद्घाटन कार्यक्रम आज होत आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesakal News

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) येथील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला गॅस पाईप लाईनच्या उद्घाटन कार्यक्रम बुधवारी (ता. दोन) मंगळवारी होत आहे. या कार्यक्रमासाठी भाजपतर्फे निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नेत्यांची नावे आहेत. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाला मात्र फाटा देण्यात आला आहे. भाजपतर्फे तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri), केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) , भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे तेवढीच नावे देण्यात आली आहेत. (Raosaheb Danve Name Not On Invitation Card Of BJP In Aurangabad)

निमंत्रण पत्रिका
निमंत्रण पत्रिका
Raosaheb Danve
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ?

दरम्यान मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते तथा भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले असल्याची चर्चाही दानवे गटातर्फे करण्यात येत आहे. मात्र शासकीय निमंत्रण पत्रिकेत मात्र रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. हे नाव नसल्याने दानवी समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com