स्त्री अबला ही फाईल डिलीट करण्याची गरज; प्रा. अहिरे

प्रा. अहिरे; नारी शक्तीचा सन्मान कार्यक्रमात महिलांचा गौरव
Respect for women power Gender Equality aurangabad
Respect for women power Gender Equality aurangabadsakal

औरंगाबाद : पुरुषांना जन्म देऊन जग दाखवणारी स्री अबला कशी असेल, स्री अबला आहे, ही फाईल कायमची डिलीट केल्याशिवाय स्री-पुरूष समतेचा प्रोग्रामच सुरू होत नाही, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. प्रतिभा अहिरे यांनी नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवारी (ता. सहा) छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नँशनल कमिटी (दिल्ली), लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठान व महाराष्ट्र गदा स्पोर्ट्स असोशिएशनतर्फे नारी शक्ती सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. सिताराम जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून निर्मला पाटील, एल. डी. पाटील, विनायक पवार, सुधाकर गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांनी स्रीयांना जाणिवपूर्वक उपेक्षित ठेवण्यात येत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

अनुराधा पिंगळेकर, मंगल कुलकर्णी, जिजाबाई सांगळे, रुपाली पाटील, सोनाली पिंगळे, रिना शकवार, अंबड पंचायत समिती सदस्य पुजा मोरे, डॉ. साबीया शेख, साजिया शेख, वैशाली अमृतकर, अनिता मुदिराज, अर्चना शितोळे, प्रा. मोमिना शहा, मोना सिंधी, सुनिता सूर्यवंशी, भारती निकम-भदाणे, कल्पना लोहिया, शिल्पा जोशी, ज्योती अभंग, मिनल निकम, शालिनी कोतकर, रुपाली फुलझेडे आदिंचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य संजय पाटील, अनिल पाटील, राजानंद सुरडकर, घमन पाटील, सतिश जाधवर, कमलेश सावंत, भरत अधाने आदिची उपस्थिती होती. सुत्रसंचालन संदिप भदाने, सुधाकर गायकवाड यांनी केले. तर आभार मच्छिंद्र राठोड यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com