औरंगाबाद : जालना मार्गावर कामांमुळे अपघाताचा धोका

जीव मुठीत घेऊन प्रवाशांचा प्रवास : उपाययोजना करण्याची मागणी
जालना मार्गावर कामांमुळे अपघाताचा धोका
जालना मार्गावर कामांमुळे अपघाताचा धोकाsakal

करमाड : गॅस पाईपलाईनचे काम तसेच नाली रुंदीकरण, रस्त्यावरील पॅचवर्क, दुभाजकावर बसविण्यात येणारे पथदिवे तसेच इलेक्ट्रिक वायरसाठी सुरू असलेल्या नालीकामामुळे जालना महामार्गावर वाहनधारकांना अक्षरश जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. एकाचवेळी सुरु असलेल्या या कामांमुळे अपघाताची शक्यता वाढली प्रशासनाने उपाययोजना कराव्या अशी, मागणी होत आहे.

चिकलठाणा येथील आठवडे बाजारापासून क्रेम्ब्रीज चौकाकडे महामार्गाच्या दुतर्फा पाणी वाहून जाळण्यासाठीच्या नालीचे काम चालू आहे. त्या लगत शहरात जसे रुंदीकरण करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवले तसे सध्या रुंदीकरण करण्यात येऊन काही ठिकाणी नाली उभारणीचे तर काही ठिकाणी खडीकरणाचे काम सुरू आहे. महामार्गावर चिकलठाणा ते शेंद्रा एमआयडीसी या भागात खड्डे पडलेल्या व खराब झालेल्या ठिकाणी पॅचवर्कच्या नावाखाली थिगळे देण्याचे काम सुरू आहे. सोबतच रस्ता दुभाजकावर लाईट्स बसविण्यासाठी खांब उभे करण्यात येत आहे. त्यासोबतच त्यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिक वायरसाठी दुभाजकावरच नालीचेही खोदकाम सुरू आहे.

जालना मार्गावर कामांमुळे अपघाताचा धोका
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

केंब्रिज चौकापासून शेंद्र्याकडे गॅस पाईपलाईनसाठी नाली करण्याचे, त्याचे पाइप्स टाकण्यासाठीचे कामही सुरू आहे. त्यावर कहर म्हणून की काय रस्ता विकासक एजंसीचे दुभाजकावरील झाडांना पाणी घालण्यासाठीचे टॅंकर दुभाजकालगत तासनतास पाणी टाकण्याचे काम करत असते. त्यामुळे हा महामार्ग सध्या ''मौत का कुऑ'' बनल्याचे चित्र आहे. शेंद्रा एमआयडीसीतील कंपन्यांच्या तीन शिफ्ट सुटण्याच्या वेळी तर तासनतास वाहतूक खोळंबा होत असून अवघ्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर वेळ लागत आहे.

गॅस पाईपलाईनसाठी उकरलेली माती काम झाल्यानंतर महामार्गावर पसरत असल्याने रस्ता घसरगुंडी ठरत आहे. महामार्गालगतच गॅस वाहून नेण्यासाठीचे पाईप्स अस्ताव्यस्त टाकण्यात आल्यानेही अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून महामार्गावर कामे करणाऱ्या कंत्राटदारांना योग्य त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत वाहनधारकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com