भगवान महावीर जयंतीचा खर्च आपातकालीन निधीसाठी 

भगवान महावीर जयंतीचा खर्च आपातकालीन निधीसाठी 

औरंगाबाद : जगातील बहुतांश देशांना या कोरोनाने विळखा घातलाय. जगात कोरोना विषाणूमुळे होत असलेली महामारी थांबवून शांततेसाठी सकल जैन समाजातर्फे विश्व नवकार जाप अभियान राबविले जाणार आहे. यापूर्वी सकल जैन समाजातर्फे दरवर्षी साजरी केली जाणारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव रद्द करून त्यासाठी खर्च होणारा निधी राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण भारतभरात या निर्णयाचे कौतुक झाले व असंख्य संस्था, महोत्सव समितींनी याचे अनुकरण केले; तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ही सकल जैन समाजाने केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सकल जैन समाजातर्फे सांगण्यात आले की, जगाच्या शांततेसाठी व लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विश्व नवकार जाप अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर औरंगाबादच्या सकल जैन समाजाने भगवान महावीर जयंतीनिमित्त असंख्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

त्यात प्रामुख्याने शहीद लष्करांच्या कुटुंबाला आर्थिक मदत, शेतकऱ्यांना खतवाटप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व युनिफॉर्म वाटप, लग्नाची आचारसंहिता आणि स्वर्गरथ आदी. यांसारख्या उपक्रमांची जागतिकस्तरावर दखल घेऊन औरंगाबादच्या जैन समाजाच्या एकतेचे नेहमीच सर्वस्तरातून कौतुक होते. या धर्तीवर जगाच्या शांततेसाठी विश्व नवकार जाप अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये औरंगाबादसह संपूर्ण भारत, युरोप, अमेरिका व संपूर्ण जगात राहत असलेल्या जैन-जैनेत्तर लोकांना सहभागी होता येणार आहे. 

रविवारी णमोकर जाप, सर्व जैन संतांचे आवाहन

विश्व नवकार जाप अभियानाला देशभरातील संपूर्ण आचार्य, मुनी, आर्यिका, माताजी, साध्वी आणि सर्व संतांनी पाठिंबा दिला आहे. येत्या रविवारी (ता. २९) मार्च जगभरातील जैन-जैनेत्तर समाजाने णमोकार महामंत्राचे जाप करावे. हा दिवस णमोकार महामंत्र जाप दिन म्हणून साजरा करावा.

प्रत्येकाने किमान णमोकार महामंत्राची एक माळ (१०८) जाप करावी. तसेच सहा एप्रिलला भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव दिनानिमित्त भारतीय वेळेनुसार सकाळी साडेनऊला जेथे असाल तेथे १२ णमोकार महामंत्राचा जाप करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com