Sambhaji nagar : अदानी समुहाच्या विरोधात ३२ संघटना एकवटल्या Sambhaji Nagar Adani Group started the activities power supply | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Adani Group power supply

Sambhaji nagar : अदानी समुहाच्या विरोधात ३२ संघटना एकवटल्या

छत्रपती संभाजीनगर : अदानी समुहाने छत्रपती संभाजीनगरात वीजपुरवठ्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लि. या नावाची कंपनी बुधवारी (ता.१५) सुरु केली आहे. या विरोधात महावितरणमधील ३२ संघटना एकवटल्या असून सर्व संघटनांनी खासगीकरणाला कडाडून विरोध दर्शविला आहे.

अदानी ट्रान्स्मिशन या वीज वितरण कंपनीने अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लि. या नावाने उपकंपनीची घोषणा केली आहे. कंपनीचा अद्याप उद्देश जाहीर नसला तरीही पुढच्या काळात अदानी समूहातर्फे समांतर वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे. याबद्दल सर्वप्रथम सकाळने वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी आंदोलनप्रसंगी कुठेही खाजगीकरण करणार नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले होते. तरीही या हालचाली सुरुच आहे. त्यामुळे याविरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेण्यासाठी ३२ संघटनांच्या कृती समितीची बैठक दोन दिवसात होणार आहे. बैठकीनंतर निश्चित दिशा ठरवून लोकशाही मार्गाने आंदोलन करू.

-सय्यद जहिरोद्दीन (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक संघटना)

वीज क्षेत्रातील खासगीकरणावर संघर्ष समितीची बैठक आयोजित केली आहे. यावर सर्व संघटनांच्या कृती समितीतर्फे पुढील धोरण निश्चित करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

-राजेंद्र राठोड (सहसचिव एस. ई. ए.)

अदानी यांच्या कामकाजाविषयी सध्या मीडियामध्ये जे काही छापून येत आहे. ते बघता अदानी यांना समांतर वीज परवाना मिळण्यासाठी जी कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनी वीज परवाना देण्यात येऊ नये, यासाठी संघटनेतर्फे विरोध करण्यात येईल. तसेच न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाईल.

- पांडुरंग पठाडे, (झोनल सचिव, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन)

अदानी समुहाने छत्रपती संभाजीनगरमध्ये समांतर वितरण परवाना शासनाने देऊ नये व शासनाने परवाना दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेना जनहित व कर्मचारी हितार्थ जन आंदोलन करेल.

-नारायण खरात (कार्याध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेना)

अदानी यांच्या कामकाजाविषयी सध्या मीडियामध्ये जे काही छापून येत आहे. ते बघता अदानी यांना समांतर वीज परवाना मिळण्यासाठी जी कंपनी स्थापन केली आहे. त्या कंपनी वीज परवाना देण्यात येऊ नये, यासाठी संघटनेतर्फे विरोध करण्यात येईल. तसेच न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाईल.

- पांडुरंग पठाडे, (झोनल सचिव, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन)

सरकार तोट्याचे कारण पुढे करून खासगीकरणाशिवाय पर्याय नाही असे सांगते. मग उद्योजक तोट्यातील उद्योग घेण्यासाठी का पुढे येत आहेत. जर उद्योग तोट्यात नसतील तर सरकार ते का विकत आहे.? हे सर्व गौडबंगाल आहे. या धोरणाला कडाडून विरोध आहे.

-नवनाथ पवार (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटना)