Sambhaji nagar : औरंगजेबाचे फलक, तिघांवर गुन्हा Sambhaji nagar Aurangzeb plaque crime against three | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News

Sambhaji nagar : औरंगजेबाचे फलक, तिघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील यांच्या नामांतरविरोधी साखळी उपोषणस्थळी औरंगजेबाचे फलक झळकावणाऱ्या तिघांविरुद्ध सिटी चौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. हि घटना १७ मार्चला दुपारी चांदणी चौकात घडली.

यासेर खान सिकंदर खान, फय्याज लतीफ आणि स्कुटीस्वार (एमएच-२०-एफएल-१९१८) अशी आरोपींची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे अलमगीर असे लिहिलेले फलक झळकाविण्याची ही दुसरी घटना आहे, प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुभाष हिवराळे करत आहेत.