Sambhaji nagar : बुलेटचा फटाका...पोलिसांचा फटका!

दिवसभरात दीड लाखांचा दंड केला वसूल
बुलेट
बुलेट sakal

छत्रपती संभाजीनगर : बुलेट म्हटली की, नजरेसमोर येतो तो फर्रर्रर्र फटाक असा आवाज अन् दचकलेले, घाबरलले चिमुकल्यांसह वृद्धांचे चेहरे. मात्र, गुन्हे शाखा आणि शहर पोलिस दलाच्या वाहतूक विभागाच्या पाच शाखांनी अखेर मनावर घेतलेच अन् दिवसभरात ‘दिसला बुलेटस्वार की घे बाजूला,

अन् काढ सायलेन्सर’ असे करत तब्बल एक लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. दिवसभर चाललेली ही मोहिम रात्री संपुष्टात आली, मात्र असे असले तरी ही मोहिम सुरुच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.(Latest Marathi News)

बुलेट
Satara : ‘मराठवाडी’त केवळ १८ टक्के पाणीसाठा

अनेक दिवसांपासून फटाका वाजविणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. सिग्नल सुटल्यानंतर सर्वात पुढे वेगात जाऊन फटाका वाजविणे, गल्ली बोळातून भरधाव वेगात जाताना मध्येच फटाका वाजविणे यामुळे अनेकजण दुचाकीस्वार घाबरतात, तर बहुतांश दुचाकीवरील वृद्ध, बालके घाबरुन जात असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. अखेर शहर पोलिस दलाने तब्बल २३९ बुलेटची तपासणी करत १४७ केसेस करुन एक लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

बुलेट
Sambhaji nagar : अपर्णा थेटे यांची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीमार्फत चौकशी

सायलेन्सरही घेतले काढून

वाहतूक शाखा आणि गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने आयुक्तालयाच्या हद्दीत फटाका वाजविणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात केवळ दंड वसूलीची कारवाईच केली नाही तर फटाका वाजविणारे चक्क सायलेन्सरही काढून घेत दुसरे सायलेन्सर बसविले. त्यामुळे आता काही अंशी या कृत्याला चाप बसेल अशी आशा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com