Sambhaji nagar : भुमरेंकडून भाजपला ठेंगा महाविकास आघाडी, शिंदेंच्या शिवसेनेत लढत

पैठण बाजार समितीवर वर्चस्व कायम राखण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाजपला वाटेकरी करून घेण्यास नकार दर्शविला.
संदीपान भुमरे
संदीपान भुमरेsakal

पैठण : पैठण बाजार समितीवर वर्चस्व कायम राखण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाजपला वाटेकरी करून घेण्यास नकार दर्शविला. त्यानंतर दोन-तीन जागांवर बोळवण करू पाहणाऱ्या भुमरेंवर भाजपच्या पदाधिकारींवर नाराजी व्यक्त करीत सगळ्या १३ उमेदवारांनी अर्ज आज मागे घेतले.

त्यामुळे पैठण बाजार समितीत शिंदे-भाजप युती होवू शकली नाही. असे असले तरी भाजप शिंदेच्या शिवसेनेचेच काम करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरे चित्र निवडणुकीनंतर कळणार आहे. दुसरीकडे ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे.

बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची युती होऊन निवडणूक लढविली जाईल, अशी शक्यता होती. परंतु युतीबाबत गेल्या दोन दिवसांपासून धुसफुस असल्याची माहिती समोर आली व त्या प्रमाणेच आज भाजप पक्षाच्या १३ उमेदवारांनी माघार घेऊन युतीत एकमत नसल्याचे अधोरेखित केले असून बाजार समिती निवडणूक व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटणार असल्याचे ही स्पष्ट झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत पंचायत या निवडणुकीत मंत्री संदीपान भुमरे शिवसेनेत असताना वर्चस्व राहिले ते वर्चस्व आता शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे कितपत टिकून राहते असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दरम्यान, शिंदे शिवसेना व भाजप मध्ये जागा वाटपावरून झालेला दुरावा कितपत परिणामकारक ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपचा एक ही उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यामुळे भाजप शिंदे गटाच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेणार की नाही या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही मंत्री भुमरेंचाच प्रचार करू असे सांगितले असले तरी काहींनी पदाधिकारी यांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखविली. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी मंत्री भुमरे यांच्यासोबत प्रचार करणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्ष मतदान कुणाला करणार हे मात्र, गुलदस्त्यात आहे.

भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्याने माघार : शिंदे

भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी माघारी नंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सोबत बाजार समितीच्या एकूण १८ संचालक पदाच्या जागा बाबत चर्चा केली असता त्यांनी भाजपने मागितलेल्या अपेक्षित जागा देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना याबाबत माहिती देऊन माघार घेतली असल्याचे सांगून निवडणुकीत भाजप युती म्हणून काम करणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com