Sambhaji Nagar : स्मार्ट सिटी बस विभागात अनेक गैरप्रकार सुरू

प्रशासक दौऱ्याहून परतल्यावर कारवाई होण्याची शक्यता
Smart City Bus Division
Smart City Bus Divisionsakal

छत्रपती संभाजीनग : स्मार्ट सिटी बस विभागात अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप नुकतेच कामावरून कमी करण्यात आलेले माजी व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी केला आहे. या विभागातील आर्थिक व अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे संबंधित अधिकारी मात्र, आता चांगलेच धास्तावले आहेत. तथापि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी हे सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यावर याबाबत कार्यवाहीची सूत्रांनी शक्यता आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे महापालिका क्षेत्रात स्मार्ट बससेवा सुरू आहे. २३ जानेवारी २०१९ पासून ही बससेवा सुरू आहे. बसचे नियोजन करताना मुख्य चालान व्यवस्थापक अनेक गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत. आरटीओच्या मान्यतेनुसार प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेणे बंधनकारक आहे. मात्र, काहीवेळा मुख्य चालान व्यवस्थापकांच्या आदेशानुसार तिकिटाची आकारणी केली गेली.

बिडकीन येथील सत्संगाच्या कार्यक्रमासाठी स्मार्ट बस दिल्या होत्या. त्यावेळी प्रवाशांकडून ५० रुपये तिकीट घेण्यात आले. हे नियमात न बसणारे असल्याचे सिद्धार्थ बनसोड यांनी म्हटले आहे. तसेच काही बससाठी २४०० रुपयांच्या पावत्या दिल्या गेल्या. वाहनांची देखभाल दुरुस्ती देखील वेळेवर होत नाही. त्यामुळेच मध्यंतरी अपघाताच्या घटना घडल्या. काही दिवसांपूर्वी बसचे स्टिअरिंगच निघून चालकाच्या हातात आले. पर्यटन मार्गावर चालणाऱ्या बसची सफाई होत नसल्याची तक्रार प्रवासी पर्यटक महिलेने केली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नीट ओव्हरटाइम दिला जात नाही, असे विविध आरोप श्री. बनसोड यांनी केले आहेत.

आठ महिन्यांपूर्वी शहर बस जळाली होती. आजवर त्या बसची दुरुस्तीही नाही आणि चौकशीही झाली नाही. विशेष म्हणजे, वेळापत्रक व्यवस्थित नसल्याने अनेक मार्गावर अपेक्षित उत्पन्न बस विभागाला मिळत नाही. प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप श्री. बनसोडे यांनी केला आहे.

दरम्यान, एवढेच नव्हे तर याविषयी सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे अनेकदा तक्रारी करून त्यांनीही लक्ष दिले नसल्याचा श्री. बनसोड यांनी आरोप केला आहे. त्यामुळे या जाहीर आरोपानंतर तरी सीईओ डॉ. चौधरी यात लक्ष घालणार का असा प्रश्‍न आहे.

बनसोड आजवर गप्प का?

बनसोड यांनी कर्तव्यावर असताना अनियमिततेचे हे प्रकार उघडकीस का आणले नाही, आता कामावरून कमी केल्यावरच त्यांचा अंतरात्मा जागा का झाला, त्यांनी हे सर्व प्रकार आताच का उघड केले अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे श्री. बनसोड यांच्या आरोपात किती तथ्य आहे, याची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी परदेश दौऱ्यावरून शहरात आल्यानंतरच होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com