Sambhaji nagar : नाथषष्ठीसाठी चोख पोलिस बंदोबस्त Sambhaji nagar Nathshashti Good police arrangement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस

Sambhaji nagar : नाथषष्ठीसाठी चोख पोलिस बंदोबस्त

पैठण : यंदाचा नाथषष्ठी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर यात्रेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पैठण येथे पोलिस बंदोबस्ताबाबत आढावा बैठक घेण्यात आली. नाथषष्ठी यात्रा उत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण मधून २९ पोलिस अधिकारी व २५० पोलिस शिपाई, ५० महिला शिपाई, दोन दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे,

अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी शनिवारी (ता.११) दिली. तसेच बीड व धाराशीव जिल्हा येथून १०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी बोलविण्यात आला असल्याचे ही त्यांनी सांगितले. नाथषष्ठी यात्रेकरिता. वाहतूक व्यवस्था वा पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

अहमदनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी गोल नाका परिसर येथे तर छत्रपती संभाजी नगरकडून येणाऱ्या वाहनासाठी संत ज्ञानेश्वर उद्यान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पाचोड मार्गाकडून येणाऱ्या वाहनांसाठी तहसील समोर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, एमआयडीसी ठाण्याचे सहायक पोलिस भागवत नागरगोजे, बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पैठणचे फौजदार संजय मदने, गोपनीय शाखा प्रमुख मनोज वैद्य यांच्यासह विविध पोलिस अधिकारी उपस्थित होते.