Sambhaji nagar : दिल्लीत होणार शंभूराजेंची जयंती

सिडको, एन ६ येथील जिजामाता शाळेत रविवारी (ता. २३) नियोजनाची बैठक पार पडली.
Chhatrapati Sambhaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharajesakal

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीराजेंची जयंती साजरी होणार आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे १४ मे २०२३ ला शंभुराजेंची जयंती होईल. हा कार्यक्रम अखिल भारतीय छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती २०२३ च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

सिडको, एन ६ येथील जिजामाता शाळेत रविवारी (ता. २३) नियोजनाची बैठक पार पडली. बैठकीस सरदार विजय काकडे, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, विकिराज पाटील, अमोल भानुसे, ॲड. सुवर्णा मोहिते, प्रा. मनिषा मराठे, सुवर्णा तुपे, दादाराव पवार, अरुण कदम, सुभाष सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाने यावर्षी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच दिल्ली येथे आयोजन करण्यात येत आहे. पूर्व तयारीसाठी दिल्ली येथे विजय काकडे, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील आदी लवकरच रवाना होणार आहेत.

शिवाय या कार्यक्रमासाठी दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील पानिपत व इतर भागात सुद्धा नियोजनाची बैठक होणार आहे. शंभुराजेंच्या जयंतीनिमित्त तिथे व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी विजय काकडे, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, ॲड. सुवर्णा मोहीते, प्रा. मनिषा मराठे, सुवर्णा तुपे आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com