Tue, October 3, 2023

Sambhaji nagar : लाडाचा जावई गेला सासरवाडीला अन् तिघाजणांनी संगनमत करून लाकडी दांड्याने...
Published on : 5 June 2023, 2:41 am
छत्रपती संभाजीनगर : सासरवाडीला गेलेल्या जावयाला तिघाजणांनी संगनमत करून लाकडी दांड्याने मारहाण केली. ही घटना दोन जून रोजी सायंकाळी मुकूंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात घडली.
याप्रकरणी परमेश्वर ज्ञानोबा पाखरे (४४, रा.जयभवानीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सुभाष अवसरमोल, सुभाष नामदेव अवसरमोल आणि एक महिला अशी त्या मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. अधिक तपास हवालदार प्रभाकर भिडे हे करत आहेत.