Sambhaji Nagar News : पोपट पकडायला गेला अन् झाला ‘पोपट’! | Sambhaji nagar young man stuck on a tree is finally freed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Nagar News

Sambhaji Nagar News: पोपट पकडायला गेला अन् झाला ‘पोपट’!

Sambhaji Nagar News : पोपट पकडण्यासाठी झाडावर चढलेला मुलगा अडकून पडल्याचा प्रकार हर्सूल भागात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी घडला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत त्याला झाडावरून खाली उतरवले.

हर्सूल पोलिस स्टेशन परिसरात मनोज कुमार हा १४ वर्षीय मुलगा गुरुवारी सायंकाळी पोपट पकडण्यासाठी एका ३० फुट उंचीच्या झाडावर चढला होता. (Sambhaji Nagar News)

पोपटाचे घर असलेल्या लाकडाच्या ढोलीत हात घातला. पण त्याचा हात त्यात अडकून पडला. हात निघत नसल्याने त्याने आरडाओरड केली.

परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड, जवान कृष्णा होळंबे, रमेश सोनवणे, योगेश दुधे, रामेश्वर बमणे, राजू ताठे, वाहन चालक योगेश दुधे यांनी धाव घेतली. त्यांनी मनोज कुमार यास सुखरूप खाली आणले. सुमारे दोन तास तो झाडावर अडकून पडला होता.(Latest Marathi News)