सेनेला ‘डॅमेज’ करण्यासाठी ‘संभाजीनगर’ची नवी खेळी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Devendra Fadnavis

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण करण्याचा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत २९ जूनला घेतला होता.

सेनेला ‘डॅमेज’ करण्यासाठी ‘संभाजीनगर’ची नवी खेळी!

औरंगाबाद - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण करण्याचा निर्णय शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत २९ जूनला घेतला होता. या निर्णयाला नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.१५) स्थगिती देत आता नव्याने शनिवारी (ता.१६) यासंदर्भात ठराव घेतला जाईल, असे जाहीर केले. यावरून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षाला ‘डॅमेज’ करण्यासाठी संभाजीनगरचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी नव्हे तर शिंदे-फडणवीस यांनी घेतल्याचे दाखविण्यासाठी नवा ‘गेम’ आखण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या काळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू केला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयालाही त्यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. हा निर्णय घाई-गडबडीत घेण्यात आल्याचे शपथविधीनंतर शिंदे-फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसारच हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात असले तरी उद्धव ठाकरे यांना या दोन्ही शहरांचे नामकरण करण्याचे श्रेय मिळू नये, यासाठीच नव्या सरकारची धडपड सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही पक्षातील पदाधिकारी मात्र मोठ्या संख्येने शिंदे गटात गेलेले नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे ठाकरे यांनी घेतलेला निर्णय स्थगित करून शिवसेनेला डिवचण्यासाठी आम्हीच औरंगाबादचे संभाजीनगर केले हे दाखविण्याचा प्रयत्न शिंदे गट व भाजपकडून सुरू आहे. औरंगाबाद महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक आगामी काळात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या सरकारने नव्याने ठराव घेण्याचा डाव टाकला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वी स्थगित केलेला निर्णय लगेच दुसऱ्या दिवसी पुन्हा घेतला जाणार आहे.

Web Title: Sambhajinagars New Game To Damage The Shivsena Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..