Sanket Kulkarni Murder Case : कुलकर्णी खून खटला, ३१ मे रोजी निकाल

शहरात २३ मार्च २०१८ रोजी भर दुपारी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कामगार चौकामध्ये पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून निर्घृण हत्या
sanket kulkarni murder case verdict on may 31 chhatrapati sambhaji nagar
sanket kulkarni murder case verdict on may 31 chhatrapati sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : शहरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांच्या न्यायालयात पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल ३१ मेरोजी देण्यात येणार आहे.

शहरात २३ मार्च २०१८ रोजी भर दुपारी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कामगार चौकामध्ये पाच ते सहा वेळा कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी संकेत जायभाय, संकेत मच्चे, उमर पटेल व विजय जोग यांना पोलिसांनी अटक करून तपास केला होता. घटनेनंतर शहरातील जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला होता.

sanket kulkarni murder case verdict on may 31 chhatrapati sambhaji nagar
Nashik Crime: कळवण येथील शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञाताने टाकला युरिया; अडीच हजार क्विंटल कांद्याचे नुकसान

न्यायालयात आरोप पत्र दाखल केल्यानंतर शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती केली. या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून सरकारी पक्षातर्फे २२ साक्षीदार तपासण्यात आले.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी सहाय्य केले. तर बचाव पक्षातर्फे ॲड. राजेश काळे, ॲड. निलेश घाणेकर, ॲड. भाले, ॲड. दळवी यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com