धक्कादायक! SBI एजंट्सने बिलासाठी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

.
.

औरंगाबाद : एक धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे. एका महिलेने सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेच्या (State Bank Of India) वसुली एजंट्सवर थकलेल्या क्रेडिट कार्ड बिलाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती. सदरील घटना फेब्रुवारी महिन्यात घडली. जेव्हा नवी दिल्ली येथील इन्क्रेडिबल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे (आयएमएस) (Incredible Management Services) मालक आणि एजंट्स यांनी पत्नीबरोबर गैरवर्तणूक करायला सुरुवात केली, अशी माहिती महिलेच्या (Crime In Aurangabad) पतीने दिली. कळस म्हणजे महिलेच्या पतीला तपासाच्या नावाखाली पोलिसांनी दिल्लीला नेल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना साधारण फेब्रूवारीमध्ये घडल्याचा महिलेच्या (Crime Against Woman) पतीने सांगितले. वसुली कर्मचाऱ्यांनी धमकी देणे, अर्वाच्य भाषा वापरणे, त्यानंतर एसएमएस पाठवून शरीर सुखाची मागणी क्रेडिट कार्ड बिल माफ करण्यासाठी हा सर्व प्रकार केला गेला, असे पतीने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. पीडित २९ वर्षीय महिलेकडे गेल्या तीन वर्षांपासून एसबीआयचे क्रेडिट कार्ड असून सर्व बिल नियमितपणे क्लिअर करण्यात येते होते. तथापि जवळपास २१ हजार रुपये थकले होते. कारण लाॅकडाऊनमुळे नोकरी गेली होती. तसेच पत्नीचा बुटिकचे दुकान बंद पडले, असे महिलेच्या पतीने सांगितले.

.
PSI होण्याचे स्वप्न अधुरे, विद्यार्थ्याचा हृदयविकाराने निधन

औरंगाबादचे पोलिस उपायुक्त दीपक गिरे म्हणाले, की एफआयआर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन नोटिस बजावण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा सदरील दांपत्याने सांगितले आहे. मात्र अचानक जुलैमध्ये पोलिस तपास सुरु करतात. ते मला नवी दिल्लीला आरोपी आयएमएसचे सीईओ धर्मेंद्र एस.कालरा आणि त्याचा वसुली एजंट रणजित कुमार यांना अटक करण्यासाठी घेऊन जातात. मी त्यांच्या खाण्या-पिण्यासह प्रवास आदींचा खर्च केला. पण त्यांनी काहीच केले नाही, असे महिलेच्या पतीने आपबीती सांगितली. या दरम्यान आयएमएसच्या एजंट्सने बनावट फेसबुक अकाऊंट सुरु केले. त्यावर दांपत्याचे फोटो शेअर करुन अपशब्द वापरले गेले. याबाबत पोलिसांना माहिती दिली. पण त्यावर कारवाई करण्यास बरेच आठवडे गेले. समाजातील आमची प्रतिमा धुळीस मिळाली आहे, असे माहिलेने सांगितले. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे. दोषींवर कारवाई करावी. आणखीन आयएमएस सीईओ आणि त्याच्या एजंटकडून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी विनंती दांपत्याने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com