औरंगाबाद : ग्रामीणमध्ये आजपासून शाळा गजबजणार

पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग : शहरात सुरू झाले १० वी, १२ वीचे वर्ग
School Reopen
School Reopensakal

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर सुरू झालेल्या शाळा अवघ्या काही दिवसातच बंद करण्यात आल्या पण इतर व्यवहार सुरूच होते. त्यामुळे पालकांसह शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होताच, पुन्हा टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू केल्या जात आहेत. मंगळवारपासून (ता.२५) ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय सोमवारी (ता. २४) घेण्यात आला. शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत.

School Reopen
तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीए; पिकपॉईंट कधी असेल? राजेश टोपेंनी दिलं उत्तर

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठकीत घेण्यात आली. यावेळी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस सर्वांनाच देण्यात आला असून, दुसऱ्या डोससाठी अधिक प्रयत्न करणे गरजचे आहेत. घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात पाठपुरावा संबंधितानी करावा, अशा सूचना देत श्री. चव्हाण म्हणाले की, सर्व सोयी युक्त कोरोना केअर सेंटर सुरु करावे तसेच तत्काळ चार बालरोग तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. महापालिकेच्या धर्तीवर ग्रामीण भागात देखील गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांच्या तब्येतीची वेळोवेळी फोनद्वारे चौकशी करावी. दरम्यान सोमवारपासून शहरात फक्त १० व १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

School Reopen
Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद

विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आली ३९ टक्क्यावर

शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळेत सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंत शाळा मंगळवारी (ता.२५) सुरू करण्यात येणार आहेत. एका सर्वेनुसार कोरोनापूर्वी ७१ टक्के ही विद्यार्थ्यांची आकलन क्षमता होती ती आता कोरोनाच्या काळात ३९ टक्क्यावर आली आहे. यामुळे दोन वर्षाचा लॉस भरून काढणे अवघड आहे. शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com