हिंगोली : शिवसंपर्क अभियानांतर्गत डिग्रस येथे संवाद मेळावा

खासदार मंडलिक यांच्या उपस्थितीत डिग्रस कऱ्हाळे येथून अभियान सुरू
आमदार संतोष बांगर
आमदार संतोष बांगरsakal

हिंगोली : तालुक्यातीलडिग्रस कऱ्हाळे येथे शिवसंपर्क अभियानाची बुधवार ता.२३ उत्साहात सुरुवात झाली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद मेळावा घेण्यात आला. खासदार संजय मंडलिक व आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत डिग्रस कऱ्हाळे येथे शिवसंपर्क अभियानाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी खासदार मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा तसेच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या देशात प्रखर हिंदुत्ववाद हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच रुजवला, येत्या काळात शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करून शिवसेना बळकट करण्याचे आवाहन खासदार मंडलिक उपस्थितांना केले. माझ्याकडे हिंगोली जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी दिला हे मी माझे भाग्य समजतो अशी भावनाही खासदार मंडलीक यांनी व्यक्त केली.

आमदार संतोष बांगर म्हणाले, भाजपला शिवसेनेवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण बीजेपी सेनेचे बोट धरूनच महाराष्ट्रात मोठी झाली आहे. एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे. तसेच इथून पुढे सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून येत्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन आयदार बांगर यांनी उपस्थितांना केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गनाजी बेले,सह संपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे,उद्धव गायकवाड, समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम डॉ.राजस राणे,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, राम नागरे, महिला जिल्हाप्रमुख रेखा देवकते, मंगल कांबळे, नंदकिशोर खिल्लारे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव अंकुशराव आहेर, आनंदराव जगताप,माजी युवासेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर शिवाजीराव कऱ्हाळे कय्युम शेख, पंढरी मगर, राजू संगेकर मयुर शिंदे, शिवराज पाटील, शिवम नाईक, पिंटू गडदे, अशोकराव काळे, अनिल कऱ्हाळे, बापूराव कऱ्हाळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com