शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे आव्हान, तयारी निवडणुकीची

शिवसेनेसमोर एकजुटीचे आव्हान
शिवसेनेसमोर एकजुटीचे आव्हान
Summary

महापालिकेत सर्वाधिक ३२ सदस्यसंख्या शिवसेनेची आहे. महापालिकेच्या राजकारणात शिवसेना भाजपची २५ पेक्षा अधिक वर्षांची युती तुटली.

औरंगाबाद : महापालिकेत Aurangabad शिवसेना-भाजप गेल्या २५ वर्षांपासून मांडीला मांडी लावून बसत होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जळफळाट झालेल्या भाजपमध्ये BJP आणि शिवसेनेत Shiv Sena विस्तवदेखील जात नाही. दोन्ही पक्षांत सध्यातरी टोकाची भाऊबंदकी सुरू आहे. या भाऊबंदकीसोबतच शिवसेनेला पक्षांतर्गत गटबाजी आणि शहरातील मूलभूत प्रश्‍नांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्याचवेळेस कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यावेळेस शिवसेनेला वातावरण अनुकूल नसल्याने कोरोना महामारीमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या, हे एक प्रकारे पथ्यावरच पडले. मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi Government माध्यमातून शहरातील रखडलेली कामे, योजना मार्गी लावून घेण्यासाठी शिवसेनेला वेळ मिळाला. आता संसर्गाची लाट ओसरत आली असून शहर अनलॉक झाले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूकही होईल ही अपेक्षाही उसळी घेत आहे. सहा महिन्यांनंतर महापालिका निवडणुका होतील असे सूतोवाच पालकमंत्री सुभाष देसाई Industry Minister Subhash Desai यांनी देखील केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या प्रश्‍नात पालकमंत्र्यांनी देखील लक्ष घातले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू झाली. त्याची कामेही सुरू झाली आहेत. मार्च २०२२ पर्यंत शहरात समान पाणीवाटप करण्यासाठी पाठपुरावा आहे. मार्च २०२२ पर्यंत ५० एमएलडी पाणी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी डीपीसीतून चार कोटींचा निधी देणार असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई यांनी शहरात गुंठेवारी वसाहतीतील मालमत्ता नियमित करण्याविषयीचा रखडलेला विषय मार्गी लावण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची सूचना केली. नगरविकास विभागांकडून गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी नियमांमध्ये काही सूट देता येईल का याबाबतची चाचपणी म्हणजे महापालिका निवडणुकांच्या Aurangabad Municipa Corporation Elections पार्श्वभूमीवर तयारीचा भाग असल्याचे मानले जात आहे. Shiv Sena Faces Internal Politics For Upcoming Aurangabad Municipality Election

शिवसेनेसमोर एकजुटीचे आव्हान
जालन्यात नदीच्या पुरात मामा-भाचे गेले वाहून, एकास वाचविण्यास यश

‘दोस्त दोस्त ना रहा’

महापालिकेत सर्वाधिक ३२ सदस्यसंख्या शिवसेनेची आहे. महापालिकेच्या राजकारणात शिवसेना भाजपची २५ पेक्षा अधिक वर्षांची युती तुटली. एकमेकांचे मित्र पक्ष आता कट्टर विरोधक बनले आहेत. यामुळे शिवसेनेला त्यांचा कट्टर असा पारंपरिक मतदार सांभाळण्याबरोबरच हिंदुत्वाच्या नावावर होणाऱ्या मतदानाचे विभाजन कसे रोखायचे याचेही आव्हान आहे. भाजपसोबतची युती तुटल्यामुळे शिवसेनेने स्वबळाची तयारी केली आहे. युती नसल्याने उलट शिवसेनेतील इच्छुकांना जास्त आनंद झाला आहे. आता स्वबळावर निवडणूक लढल्यास शिवसेनेच्या जागा वाढण्याची अपेक्षा आहे. शेवटी राज्यात महाविकास आघाडी असल्याने महापालिका निवडणुकीत आघाडी होईल किंवा नाही हे वरिष्ठ पातळीवरूनच ठरेल आणि तेच मान्य असेल.

बैठकांवर बैठका

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त गाव या संकल्पनेची घोषणा केल्यानंतर निर्धार कोरोनामुक्त गावमोहिमेत गावोगावी बैठका घेऊन कोरोनाविषयक जनजागृती सुरू केली आहे, हीच मोहीम महापालिका क्षेत्रातही राबवली जात असून वॉर्डनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. कोरोना जनजागृतीबरोबरच शिवसैनिकांना लोकांमध्ये संपर्क वाढवण्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांनीदेखील महापालिकेत आपली पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी शिवजनसंपर्क मोहिमेअंतर्गत प्रत्येक वॉर्डात बैठका घेऊन गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

शिवसेनेपुढील आव्हाने

- जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे जरी आमच्यात कसलेही मतभेद नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्यातील अंतर्गत गटबाजी लपून राहिलेली नाही. यामध्ये शिवसैनिकांची द्विधा मनःस्थिती आहे.

- भलेही १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली तरी शहरात आजही पिण्याचे पाणी कुठे पाचव्या दिवशी तर कुठे सहाव्या दिवशी येत आहे.

- शहर वाढताना गुंठेवारी वसाहतीही वाढल्या. गुंठेवारी वसाहतींमधील मालमत्ता नियमित करण्याच्या निर्णयाची नुसती घोषणा झाली मात्र अजूनही या मालमत्ता नियमित झाल्या नाहीत.

- शहराचा विकास आराखडा मंजूर झाला नसल्याने शहराचा विकास रखडला आहे.

- सिडको-हडकोमध्ये शिवसेनेचा सर्वाधिक मतदार आहे. मात्र सिडको-हडकोचे लीजहोल्डचे फ्रीहोल्ड झालेले नाही. नुसती घोषणा झाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com