शिवसेना आमदार गायकवाडांच्या प्रतिमेस जोडे मारत भाजपने केला निषेध

गारखेड्यातील भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.
Buldana was protested by kicking shoes
Buldana was protested by kicking shoesFile images

औरंगाबाद : बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा रविवारी (ता.१८) भाजप शहर कार्यकारिणीतर्फे आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध करण्यात आला.

Summary

कोरोना नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आले. यामुळे असे वक्तव्य करत असल्याचा आरोपही केणेकरांनी केला.

गारखेड्यातील भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले. आमदारावर गुन्हा दाखल करावा, शिवसेना स्वत:चे अपयश झाकण्यासाठी असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप संजय केणेकर यांनी केला. कोणत्याही संकटात भाजप, आरएसएस, बजरंग दल, विश्‍वहिंदू परिषद रस्त्यावर उतरत मदत करते. कोरोना नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश आले. यामुळे असे वक्तव्य करत असल्याचा आरोपही केणेकरांनी केला.

यावेळी संघटन सरचिटणीस राजेश मेहता, मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, महिला मोर्चा अध्यक्षा अमृता पालोदकर, मनीषा मुंडे, मंगलमूर्ती शास्त्री, हापिज शेख, राहुल चाबुकस्वार, दिव्या पाटील, धनंजय पालोदकर, निरज जैन, प्रतिभा जऱ्हाड, शिवगंगा जायभय पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com