Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची आज शहरात सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची आज शहरात सभा

औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. रविवारी ही यात्रा औरंगाबादेत येणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता टिव्ही सेंटर येथे महासभा होणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी दिली.

सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत यांची विशेष उपस्थिती राहील.

उपस्थितीचे आवाहन माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदूळवाडीकर, संतोष जेजूरकर, राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य, सुशील खेडकर, अक्षय खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कसंघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी केले.