औरंगाबाद : लसीकरणाची मंदावली गती ;शहरात बुस्टर डोसलाही अत्यल्प प्रतिसाद

कोरोना संसर्ग वाढताच लसीकरण केंद्रावर लागलेल्या रांगा हळूहळू कमी होत आहेत
vaccination
vaccinationsakal

औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढताच लसीकरण केंद्रावर लागलेल्या रांगा हळूहळू कमी होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्ससाठी सुरू केलेल्या बुस्टर डोसलाही कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेला पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.

शहरातील सुमारे अकरा हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच १५ ते १८ वयोगटातील ६९ हजार ९९९ मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या नऊ लाख ३२ हजार १८७ आहे. त्याची टक्केवारी ८२.८१ टक्के आहे. दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या पाच लाख ६१ लाख १९६ आहे. त्याची टक्केवारी ४९.८६ टक्के आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची आभासी पद्धतीने बैठक घेऊन लसीकरणाची गती वाढविण्याची सूचना केली होती. त्यामुळे प्रशासनाने लस नाही तर प्रवास नाही, मॉलमध्ये प्रवेश नाही यासह विविध निर्बंध लागू केले. त्यात कोरोनाबाधितांची संख्याही वाढली. त्यामुळे काही दिवस लसीकरणाच्या प्रक्रियेला गती आली. मात्र पुन्हा रांगा गायब आहेत. ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लागू करण्यात आलेल्या बुस्टर डोसला देखील प्रतिसाद कमी आहे.

बुस्टर डोस दीड टक्क्यांवर

बुस्टर डोस घेतलेल्यांची संख्या केवळ १८ हजार ३३६ एवढी आहे, त्याचे प्रमाण १.६३ टक्के आहे. १५ ते १८ या वयोगटातील ३६ हजार ४४५ मुलांनी आत्तापर्यंत पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन हजार ३४६ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com