
सोलापूर-धुळेसह तीन महामार्गांचे आज 'गडकरींच्या' हस्ते लोकार्पण
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गासह (क्र. ११२ आता नवीन क्र.५२) अन्य तीन महामार्गाचे लोकार्पण आणि चार महामार्गाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. जवळपास ३ हजार ३१७ कोटी रुपयांच्या कामांचे लोकापर्णाचा हा कार्यक्रम असणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कराड म्हणाले, येथील बीड बायपासवरील जाबिंदा लॉनवर सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे सोलापूर ते कन्नड पर्यंतच्या प्रकल्पाचे लोकार्पण. नगरनाका ते केंब्रिज स्कूल १४ किलोमीटर लांबीचा प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येईल. तर औरंगाबाद ते पैठण ४२ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदीकरणाचे भूमीपूजन, दौलताबाद ते माळीवाडा चार किलोमीटर आणि देवगाव रंगारी ते शिऊर २१ किलोमीटरच्या रस्त्याचे भूमिपूजन, राष्ट्रीय महामार्ग ७५२ एच भागातील २ लेन पेव्हर शोल्डर बीटी रोड कसाबखेडा पासून ते देवगाव रंगारी सुधारणा यासह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चिखली-दाभाडी तळेगाव २ लेन पेव्हर शोल्डर पालफाटा हा ३७ किलोमीटरचा रस्त्याचे सिमेट काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी २० हजार चौरस मीटरचा भव्य मंडप उभारण्यात आला असून ५ हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेस आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवीण घुगे, भगवान घडामोडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, समीर राजूरकर, विजय औताडे उपस्थित होते.
Web Title: Solapur Dhule Including Three Highway Inauguration Today Nitin Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..