शासनाचे लक्ष औरंगाबादकडे नाही, भागवत कराड यांची महाविकास आघाडीवर टीका

'राज्य शासनाने जागा न दिल्याने आम्ही गोरगरिबांना घरे देऊ शकलो नाहीत.'
Bhagwat Karad
Bhagwat Karadesakal

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाचे लक्ष औरंगाबादकडे नाही. राज्य शासनाने जागा न दिल्याने आम्ही गोरगरिबांना घरे देऊ शकलो नाहीत, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) केली. आज बुधवारी (ता.दोन) औरंगाबाद (Aurangabad) येथे गॅस पाईप लाईन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कराड म्हणाले, गॅस पाईप लाईनच्या शुभारंभ प्रसंगी सर्वप्रथम सर्व माता, भगिनी यांना अभिवादन करतो. आपले असेच प्रेम असू द्या. एलपीजी गॅस ३० टक्क्यांनी स्वस्त राहणार आहे. शहरात गॅस आणण्यासाठी २५ हजार सिलिंडर आणावे लागते. या घरगुती गॅसमुळे माता-भगिनींची सोय होईल. (State Government Not Pay Attention To Aurangabad, Bhagwat Karad Attack On Mahavikas Aghadi)

Bhagwat Karad
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ?

तसेच गॅस पाईप लाईनमुळे उद्योगांना चालना मिळण्यास मदत होईल. हा प्रकल्प जवळ-जवळ चार हजार कोटी रुपयांचा आहे. तो चार वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. औरंगाबादेतील सर्वांसाठी तो लाईफ लाईन ठरणार आहे. आजही आठ-आठ दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही. आपण ५५ किलोमीटरवरुन पाणी आणू शकत नसल्याची टीका भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी शिवसेनेवर केली. पीएनजी गॅस पाईप लाईन लवकरच कार्यान्वित होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com