मोबाइलवर लाइव्ह लोकेशन शोधून रेल्वेखाली आत्महत्या

आत्महत्येचे ‘प्लॅनिंग’
 रुपेश देवडे
रुपेश देवडेSakal

औरंगाबाद - दोघेही उच्चशिक्षित. तो सीएचे शिक्षण घेत होता. मैत्रीच्या हट्टापायी दोघा मित्रांनी मेसमध्ये एकाच ताटात जेवण केले. दुसऱ्या मित्राला फिरायला चल म्हणत हा रेल्वेरुळाकडे गेला. लघुशंकेचे निमित्त करुन बाजूला होत रेल्वे येताच धावत्या रेल्वेसमोर उडी घेत त्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याचे ठरवूनच रुळाकडे गेलेल्या मित्राने रेल्वेचे लाईव्ह लोकेशनही शोधल्याचे समोर आले. हा दुर्दैवी प्रकार मंगळवारी (ता. १९) रात्री संग्रामनगर उड्डाणपुलाखालच्या रेल्वेरुळावर घडला. रुपेश दिगंबर देवडे (२४, रा. अजबनगर, ममूळ रा. सिल्लोड) असे त्या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश देवडे हा मूळ सिल्लोड तालुक्यातील असलेला २४ वर्षीय तरुण औरंगाबादेत सीएचे शिक्षण घेत होता. रुपेश हा निलेश कोठाळे या विद्यार्थ्यासोबत अजबनगरातील किरायाच्या खोलीत राहत होता. मंगळवारी रात्री रुपेशच्या हट्टापायी दोघांनी मेसमध्ये एकाच ताटात जेवण केले. त्यानंतर निलेशला सोडून रुपेश हा त्याचा दुसरा मित्र अश्वजित जाधव याच्याकडे गेला. त्याला ‘चल फिरून येऊ’ असे म्हणत दोघेही दुचाकीवरून संग्रामनगर उड्डाणपुलाच्या दिशेने गेले. रुपेशने लघुशंकेची थाप मारत अश्वजितला उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर घेऊन गेला. तेथे रेल्वे येताच अश्वजितसमोर त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली, ते दृश्य पाहून काहीवेळ अश्वजित स्तब्ध झाला होता. त्याने तात्काळ घटनेची माहिती रुपेशच्या मोठ्या भावाला कळविली. अभ्यासात हुशार असलेल्या रुपेशने असा टोकाचा निर्णय का घेतला हे स्पष्ट होऊ शकले नाही. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

आत्महत्येचे ‘प्लॅनिंग’!

विशेष म्हणजे रुपेश याने आत्महत्येचे ‘प्लॅनिंग’च केल्याचे समोर आले आहे. मित्र अश्वजितसोबत दुचाकीवर जात असताना त्याने मित्र अश्वजीतला ‘आज माझा शेवटचा दिवस आहे’ असे बोलला होता. त्यावर अश्वजितने असे काहीही बोलू नको म्हणत त्याला समजावले होते. त्याचवेळी रुपेश हा वारंवार मोबाईलकडे बघत होता. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईल बाजूला फेकल्याचे समोर आले. दरम्यान उपस्थितांना जेव्हा रुपेशचा मोबाईल सापडला त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये रेल्वेचे लाईव्ह लोकेशन शोधल्याचे आढळून आले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी अश्वजित याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com