अवैध गांजाची वाहतुक करणारे तिघे जण जेरबंद

साडेतेरा लाखाचा ऐवज जप्त
Accused Arrested
Accused ArrestedSakal

पाचोड (जि. औरंगाबाद) - अवैधरित्या गांजाची वाहनाद्वारे वाहतुक करणाऱ्या तिघां जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करुन त्यांचेकडून अठ्ठावीस किलो गांजासह तेरा लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केल्याची घटना धूळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) येथे बुधवारी (ता.एक) रात्री घडली.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे आपल्या सहकार्यासमवेत पाचोड पोलीस ठाणे हद्यीत अवैध धंदयाची माहिती काढून कारवाई करणेकामी गस्त घालत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडून बीडकडुन पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कार (क्र. एम.एच- १७- ए. ई- ३०१३)मध्ये अवैधरित्या चोरटी वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रेंगे यांनी पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांना या घटनेची माहीती दिली. तोच पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांनी कारवाईच्या सुचना देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. स्थानिक शाखेच्या पोलिसां नी संबंधीत वाहनावर कारवाई करणेसाठी औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडच्या बायपासवरील हॉटेल नाना रसवंती गृहाजवळ शासकीय पंचाना सोबत घेऊन सापळा रचला.

पोलिस प्रतिक्षेत असतानाच रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास सदरचे संशयीत वाहन येतांना त्यांना दिसले, तोच पोलिसiनी त्या वाहनास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने हे वाहन रस्त्याच्या बाजुला घेतले. सदर वाहनामध्ये चालकासहित तिन इसम होते, पोलिसांनी त्यांना त्यांचे नांव व गांव विचारले असता त्यांनी आपली नावे अशोक आनंदा गायकवाड (वय २७ वर्ष), आबासाहेब परभत दरेकर (वय ४०वर्ष) व महेश भगवान दरेकर (वय२७ वर्ष) सर्व रा. पाथ्री (ता.वैजापुर) असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील कारची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर कारच्या आसनाखाली व बोनटमध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाचे एकुण चौदा पाकीटे मिळून आली.

सदर पाकीटांमध्ये हिरवट रंगाचा उग्र वास येत असलेला गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याचे एकत्रित वजन केले असता ते एकूण अठ्ठावीस किलो भरला पोलिसांनी सदरचा गांजा व वाहतूक करण्या साठी वापरलेली पांढऱ्या रंगाची इनेव्हा कार (क्र .एम.एच -१७- ए.ई-३०१३)तसेच तीन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण तेरा लाख तेहतीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन उपरोक्त इसमांविरुध्द पाचोड पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यांत केला असुन पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, सुशांत सुतळे, संतोष चव्हाण, अभिजित सोनवणे आदी करीत आहे.

उपरोक्त कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड,पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप दूबे, जमादार श्रीमंत भालेराव, पोलिस नाईक वाल्मीक निकम, उमेश बकले पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, योगेश तरमळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com