esakal | बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

market

बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: ब्रेक द चेनअंतर्गत (break the chain) मार्चपासून व्यापारी आस्थापना बंद आहेत. व्यापाऱ्यांनी संचारबंदीचे (covid 19 curfew) पालन करीत सरकारला साथ दिली आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याने व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने आता टप्प्या-टप्प्याने बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देण्यात यावीत. तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक पॉकेज जाहिर करावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे बुधवारी (ता.२६) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

निवदेनात म्हटले की, व्यापाऱ्यांना मालमत्ता कर, वीज बिल, जीएसटी या सरकारी करांमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत मिळाली नाही. ती सवलत देण्यात यावीत, यामागणीचे पत्र पालकमंत्र्यांना वेळोवेळी देण्यात आले आहे. मॉन्सून तोंडावर आल्याने दुकानांची डागडुजी, दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार, दुकान भाडे, स्वतःचे घर खर्च भागवणे, औषधउपचार खर्च, व्यावसायिक कर्जावरील व्याज या कामांसाठी दुकाने सुरु करण्यास परवागीही मागितली होती. त्यासह मंजुरी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा: मराठवाड्यात रुग्णसंख्येत घट; काळजी घेण्याचे आवाहन

यामुळे एक जूनपासून टप्प्या-टप्प्याने दुकाने सुरु करण्यात यावीत. शासनाच्या नियमाचे पालन करीत सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत दुकाने उघडू द्यावीत. निवेदन देताना महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, जयंत देवळाणकर , संतोष कावले व व्यापारी उपस्थित होते.