औरंगाबादच्या दोघा तरुणांचा सावंगीत पाण्यात बुडून मृत्यू

File photo
File photo

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री (Phulambri) पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या सावंगी परिसरातील गट क्रमांक ८२/२ मध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२५) घडली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मोहम्मद असलम नियाजी (वय २२, रा दिल्लीगेट, औरंगाबाद) (Aurangabad) व शेख साजिद शेख याकूब (वय २४, रा.कैलासनगर, औरंगाबाद असे मृत तरुणांची नावे आहेत. याबाबत फुलंब्री पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलिस ठाणे फुलंब्री हद्दीत सावंगी येथील शेततळ्यामध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मोहम्मद असलम नियाजी व शेख साजिद शेख याकूब हे पोहणे करिता गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मरण पावले आहे.(two youth drowned near sawangi of aurangabad glp88)

File photo
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

अग्निशामक दल व स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदन करिता औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठविले आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com