सामाजिक जबाबदारीतून २० हजार नागरिकांना लस

औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने लक्ष्य केले साध्य
Vaccination
Vaccinationsakal

औरंगाबाद ः कोरोनाच्या काळात येथील वाळूज परिसरातील औद्योगिक संघटनांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत कोरोना लसीकरण करण्याची मोहीम यशस्वी केली. एंड्रेस अँड हाऊजर कंपनीत औद्योगिक संघटनांद्वारे सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत २५ ऑक्टोबरला २० हजारांचा टप्पा पार करण्यात यश आल्याचे पत्रकार परिषदेत सीआयआयचे व्हाईस चेअरमन एन. श्रीराम यांनी सांगितले.

यावेळी आयआयचे विभागीय अध्यक्ष रमण अजगावकर, मासिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, मासिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, राहुल भोगले, हेमंत लांडगे, विकास पाटील, सर्जेराव साळुंखे उपस्थित होते.

Vaccination
बाबा रामदेव अडचणीत! अॅलोपॅथी विरोधातील वक्तव्य भोवणार

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी जुलै २०२१ला एंड्रेस अँड हाऊजरने पुढाकार घेत लसीकरण मोहीम सुरू केली. यात बजाज समूहांकडून लसींच्या देणग्या आणि बीएम कन्स्ट्रक्शन्स, कॅनपॅक, एंड्रेस अँड हाऊजर, किस्टलर, नाथ सीड्स, सेवक ट्रस्ट आणि सीमेन्स इतर अनेक संस्थांनी सीआयाय फाउंडेशनद्वारे केलेल्या देणग्यांमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले. तसेच कर्मचाऱ्यांच्या सहभागाने, लसीकरणासंदर्भात जनजागृती करून २० हजार नागरिकांना लस देण्यात आली आल्याचे श्रीराम म्हणाले. दगडू मोगल म्हणाले, की वाळूज परिसरातील सर्व कंपनीत जाऊन सर्वांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. यात आलेल्या एकाही नागरिकांना विना लसीशिवाय पाठवले नाही.

अप्पासाहेब सकट म्हणाले की, हे काम करत असताना समाधान मिळाले, ही मोहीम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम केले. मोनाली काळे म्हणाल्या, की कंपनीने गरीब नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. शिल्पा मुराडी, डॉ. सारिका बावस्कर, चारुदत्त मुश्रीफ यांनी आपले अनुभव सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com