vinayak mete
vinayak metevinayak mete

विनायक मेटेंना अर्वाच्य शिवीगाळ, पक्षाच्या सदस्यासही गंभीर मारहाण

संशयितांनी अर्वाच्य शिवीगाळ केली, तसेच पक्षाचे सदस्य तथा हॉस्पिटलचे मालक डॉ. अभिमन्यू माकणे यांनाही गावगुंडांनी जबर मारहाण केली

औरंगाबाद: मराठा आरक्षणासंदर्भात शिवसंग्रामतर्फे एका हॉस्पिटलमध्ये आयोजित बैठकीदरम्यान शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे (vinayak mete) यांना संशयितांनी अर्वाच्य शिवीगाळ केली, तसेच पक्षाचे सदस्य तथा हॉस्पिटलचे मालक डॉ. अभिमन्यू माकणे यांनाही गावगुंडांनी जबर मारहाण केली. यात डॉ. माकणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता.२४) सकाळी साडेअकराला घडली.

यासंदर्भात डॉ. अभिमन्यू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पडेगावातील भारत गॅस गोडाऊनसमोर, लोकमंगल कॉलनी येथे त्यांचे ईश्वर हॉस्पिटल आहे. डॉ. अभिमन्यू हे शिवसंग्रामचे सक्रिय कार्यकर्ते (सदस्य) आहेत, तर त्यांचे वडील हे शहराध्यक्ष आहेत. गुरुवारी विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात शहरात २६ जून होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात नियोजन व बैठकीचे आयोजन निमंत्रितांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या बैठकीत राहुल यलदी, सचिन घनवट हेदेखील उपस्थित होते.

vinayak mete
चिंताजनक! मराठवाड्यात सलग दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली

दुपारी एकच्या दरम्यान बैठक सुरू असताना यलदी व घनवट यांनी बैठकीच्या बाहेर जाऊन अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे यांच्यासह इतरजण आणि हे दोघे पुन्हा बैठकीत आले. संशयित अंबादास म्हस्के याने आमदार मेटे यांना अर्वाच्य शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. त्याच्यासोबतच्या किसन घनवट, मुळे व इतरांनी टेबलची फेकाफेक केली. नवनाथ मुळे याने डॉक्टर अभिमन्यू यांच्या पोटात लाथ घातली, तर म्हस्के याने डोक्यात तसेच कानाखाली चापट मारली. दरम्यान, तिघा संशयितांपैकी एकाने डॉ. अभिमन्यू यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन (किंमत एक लाख रुपये) हिसकावून नेली.

यलदी याने पाठीत जोरात लाथ मारली, तर घनवट याने डोक्यात प्रहार केला. पाचही संशयितांना हॉलमधून बाहेर काढेपर्यंत ते शिवीगाळ करत होते. दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांनी घटनेचे चित्रीकरण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारासंदर्भात मेटे यांनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणात पाच जणांसह इतरांविरोधात छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com