Crime News : 'पतीसोबत नको तर माझ्यासोबत दर्शनासाठी चल' म्हणत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Crime News : 'पतीसोबत नको तर माझ्यासोबत दर्शनासाठी चल' म्हणत महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण

छत्रपती संभाजीनगर : पतीसोबत दर्शनासाठी जाणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करत ‘तु तुझ्या पतीसोबत दर्शनासाठी जाऊ नकोस, माझ्यासोबत चल’ असे म्हणत अंगचटीला येत दोघांनी विवाहितेचा विनयभंग केला, तर तिच्या पतीला मारहाण करण्यात आली. हा प्रकार २१ मे रोजी सायंकाळी कर्णपुरा भागात घडला.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन विनयभंग करणाऱ्या दोघाजणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश काशीराम चिपोल आणि विक्की बरेलीकर (रा. रोहिदासपुरा, जुनामोंढा) अशी त्या विनयभंग करणाऱ्या दोघा आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती पतीसोबत कर्णपूरा येथील मंदिरात दर्शनासाठी जात असताना वरील दोघा आरोपींनी दाम्पत्याचा पाठलाग केला. दरम्यान आरोपी आकाश चिपोल याने विवाहितेच्या अंगचटीला येत तिचा विनयभंग केला.

तर दुसरा आरोपी बरेलीकर याने विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार जाधव हे करत आहेत.

टॅग्स :policecrimewomen