हताश! घामाने पिकवलेले टोमॅटो इच्छा नसताना शेतकऱ्याने दिले फेकून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केकत जळगाव(ता.पैठण, जि.औरंगाबाद) : तरुण शेतकरी गणेश थोरे याने टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. (छायाचित्र : हबीबखान पठाण)

हताश! घामाने पिकवलेले टोमॅटो इच्छा नसताना शेतकऱ्याने दिले फेकून

पाचोड (जि.औरंगाबाद) : नव्या उमेदीने शेती व्यवसायात (Farming) उतरलेल्या तरुण शेतकऱ्याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने तोडलेले टोमॅटो ट्रॅक्टरमध्ये भरून रस्त्यावर फुकट.... फुकट म्हणत फेकून दिल्याची घटना केकत जळगाव (ता.पैठण) (Paithan) येथे घडली आहे. त्या तरुण शेतकऱ्याचे गणेश अजिनाथ थोरे असे नाव आहे. केकत जळगाव येथील गणेश यांनी जून महिन्यात आपल्या शेतात २० गुंठे क्षेत्रावर टोमॅटोची लागवड (Tomato Cultivation) केली. मशागत, खते आदीसाठी त्यांचे ३० हजार रूपये खर्च झाले. जेव्हा टोमॅटो विक्रीस आले, तेव्हा त्यास कवडीमोल भावाने विक्री करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. प्रति कॅरेट पाच ते दहा रुपये दराने (Aurangabad) टोमॅटो विक्रीस भाव मिळाला. त्यात तोडणी व वाहतुकीचा खर्चही निघाला नाही. टोमॅटोला योग्य भाव न मिळाल्याने घेतलेले पीक रस्त्यावर फेकण्याशिवाय त्यांना (Agriculture) पर्याय उरला नाही. अखेर शुक्रवारी (ता. २०) या शेतकर्‍याने ट्रॅक्टरभर टॉमेटो विक्रीसाठी तोडले.

हेही वाचा: रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली, राहुल गांधींना म्हणाले..

मात्र भाव न मिळाल्याने सर्व टोमॅटो चक्क रस्त्यावर फेकले. एवढेच नव्हे तर टोमॅटोवर झालेला तीस हजारांचा खर्च देखील या पदरात न आल्याने त्यांनी नाराज होऊन रस्त्याच्या बाजूला टोमॅटो फेकून टोमॅटोच्या शेतात रोटाव्हिटर फिरवून रान मोकळे केले. सध्या सर्वत्र पिकलेले टोमॅटो बाजारात अल्पदरात विकले जात आहेत. शेतकऱ्यांना घेतलेल्या मालाची पैसे मिळत नाहीत. टोमॅटोसाठी केली जाणारी मशागत व देखभाल जिकरीची असून त्यास भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतीच्या माध्यमातून दोन पैसे मिळवावेत. हा उद्देश ठेवून केलेल्या टोमॅटोचे पीक असे रस्त्यावर फेकून देताना शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांकडून योग्य भाव देऊन मालाची खरेदी करावी. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आहे.

हेही वाचा: औरंगाबाद पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू, रावसाहेब दानवेंची गर्जना

केलेला खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा शेतकरी गणेश थोरे यांनी व्यक्त केली. बाजारपेठेत टोमॅटो नेल्यानंतर व्यापारी कमी दरात टोमॅटो घेतात. या ग्राहकांना आठ-दहा रुपये किलोने टोमॅटो मिळतात. शेतकऱ्यांना तीन -साडेतीन रुपये प्रमाणे टोमॅटो द्यावे लागतात. टोमॅटो पंचवीस किलोचा कॅरेट १० ते १५ रुपये दराने विकण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. एका कॅरेटमध्ये २५ किलो टोमॅटो बसतात. दोन रुपये दर अशी आजची स्थिती आहे. वाहतूक करून बाजारात टोमॅटो नेले तरी पदरमोड करावी लागते. टोमॅटोचे दर पडल्यामुळे खर्चही निघत नाही असेही श्री.थोरे यांनी सांगितले.

Web Title: Youth Farmer Unwillingly Throw Tomatos On Road In Paithan Tahsil Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :aurangabad