मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
Summary

प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना आत्मदहन करणार असल्याचा इशारा ऑनलाइन इ-मेलद्वारे पोलिस ठाणे व मंत्रालयात पाठविण्यात आला होता.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : केंद्र व राज्य सरकार कोर्टमध्ये बाजू मांडण्यास कमी पडले. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. हे आरक्षण रद्द (Maratha Reservation) झाल्याने फुलंब्री (Phulambri) तालुक्यातील गेवराई पायगा येथील एका ३० वर्षीय तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता.१) दुपारी ३ वाजता घडली. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा, वडोद बाजार, फुलंब्री पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदर तरुणाला ताब्यात घेण्यात आले. मंगेश साबळे (वय.३० रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत (Aurangabad) अधिक माहिती अशी की, मंगेश हा सुशिक्षित तरुण असून काही महिन्यापूर्वी प्रहार संघटनेचे जोडला गेला आहे. प्रहार संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष म्हणूनही मंगेश साबळे काम पाहत होता. न्यायालयामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ त्याने गावात आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांना बंदी घालण्याचे फलक लावले होते. त्यानंतर प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांना आत्मदहन करणार असल्याचा इशारा ऑनलाइन इ-मेलद्वारे पोलिस ठाणे व मंत्रालयात पाठविण्यात आला होता.

मराठा आरक्षण
Corona Updates : मराठवाड्यात कोरोनाचे नवे १०५६ रुग्ण

यानंतर २४ मे पासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. दरम्यान, आत्मदहनाचा इशारा देण्यापूर्वी प्रहार संघटनेचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांच्याकडे दिला असल्याचे त्यांनी एका व्हिडिओ सांगितले होते. त्यानंतर आत्मदहन करणार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सदर तरुण सावंगी परिसरातून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, फुलंब्री, वडोद बाजार पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी दुपारी ३ वाजता तो एका चारचाकी वाहनातून उतरताच पोलिसांनी चारही बाजूने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने गाडीतून उतरून डिझेल अंगावर ओतण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्यास सर्वप्रथम वडोद बाजार पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याठिकाणी प्रतिबंधक कारवाई करीत तहसील कार्यालयात हजर करण्यात आले होते. तहसीलदारांनी जामीनावर त्यांची सुटका केली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अशोक मुद्दीराज, वडोद बाजारच्या सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com