साद देते हिमशिखर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

मनीषा वाघमरेने माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षी आखलेली मोहीम विपरीत हवामानामुळे फसली. पण माघारी फिरून तिने या मोहिमेची पुन्हा तयारी करत यंदा आपल्या ध्येयाकडे पुनश्च वाटचाल सुरू केली आहे.

औरंगाबाद - माउंट एव्हरेस्ट पार करण्यासाठी गेलेली औरंगाबादकर प्रा. मनीषा वाघमारे आता आपल्या यशाच्या जवळ आलेली आहे. कॅम्प थ्री पासून साऊथ कोल अर्थात कॅम्प फॉर कडे तिने वाटचाल सुरू केली आहे. 

मनीषा वाघमरेने माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षी आखलेली मोहीम विपरीत हवामानामुळे फसली. पण माघारी फिरून तिने या मोहिमेची पुन्हा तयारी करत यंदा आपल्या ध्येयाकडे पुनश्च वाटचाल सुरू केली आहे. सुमारे दीड महिना एव्हरेस्ट परिसरात घालवल्यानंतर  माउंट एव्हरेस्ट (८८५० मी.) ची चढाई तिने सुरू केली आहे. कॅम्प वन, टू आणि थ्री मार्गे ती आता माउंट एव्हरेस्टच्या शिखराकडे मार्गक्रमण करत आहे. रविवारी (ता. २०) ती आणि चमू साऊथ कोल च्या दिशेने रवाना झाला. शिखर माथा गाठण्यापूर्वी तिचा हा शेवटचा थांबा राहणार आहे. सोमवारी (ता. २१) सकाळी मनीषा एव्हरेस्ट सर करण्याची आशा आहे. 

वाऱ्याचा वेग, तापमान -१६ अंश - 
मनीषा वाघमारे जात असलेल्या साऊथ कोल भागात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने येथे बर्फ साचून राहत नाही. पण येथील वातावरण भयावह असल्याने याला डेथ झोन सुद्धा म्हणतात. ऑक्सिजन कमी असल्याने आणि तापमान उणे असल्याने पचनक्रिया मंदावते आणि अनेकांची ती बंदही पडते. येथे झोपणे सुद्धा कठीण असून मनीषा या मार्गे शिखरमाथा गाठणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Aurangabadkar Manisha walks towards South Coal