येमेनची कन्या झाली औरंगाबादची सून..

अतुल पाटील
Tuesday, 19 November 2019

  • वधू अंध व्यक्तींसाठी चालवते एनजीओ
  • मेहेरच्या स्वरुपात 6700 दिले डॉलर
  • लग्नाचा संपुर्ण खर्च वरपक्षाने उचलला

औरंगाबाद : लग्न करायचे म्हटले कि, सोयरिक जवळची हवी. अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, औरंगाबादच्या एका युवकाने सोयरिक थेट अरब राष्ट्रातील येमेनच्या तरुणीशीच जुळवली. परंपरेला छेद देताना लग्नाचा खर्च तर वरपक्षाने केलाच शिवाय, मेहेरच्या स्वरुपात 6700 अमेरिकी डॉलर मुलीला दिले. त्यामुळेच हे लग्न आता चर्चेचा विषय ठरत आहे.

शहरातील मिन्हाज खान यांची कन्या शाहीना येमेनची राजधानी "सना' येथील युवकाशी लग्न करून सध्या सौदी अरबमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. कन्येच्या पुढाकारानेच लग्नाचा योग जुळून आला आहे. वधू इमान बिन अब्दुस सलीम ही उच्चशिक्षित आहे. तिने सना येथील विद्यापीठातून एम ए इंग्रजी ही पदवी प्राप्त केली आहे सना येथे अंध व्यक्‍तीसाठी एनजीओ चालवत. तर, नवरदेव अवेस खान यांनी मौलाना आझाद शिक्षण संस्थेत एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

कसं काय बुवा : जायकवाडीत पाहुण्या पक्षांचे आगमन लांबले

लग्नाचा खर्च वरपक्षाने उचलला. तसेच मेहेरची भारतीय चलनानुसार 4 लाख 80 हजार रुपयांची रक्‍कम विवाहस्थळीच मुलीला देण्यात आली. तलाक होण्याची वेळ आल्यास वराने वधूला अतिरिक्‍त सात हजार डॉलर द्यावे लागतील. असा करारही करण्यात आला आहे.

आमच्या देशातील अनेक विद्यार्थी भारतात उच्चशिक्षणासाठी वर्षानुवर्षे राहत आहेत, यामुळे मलाही भारताबद्दल आपुलकी आहे. इथे मानवतेला परमोच्च प्राधान्य दिले जाते. म्हणून मी आपल्या मुलीला इथे देणे पसंत केले.
- सलीम बिन मोहम्मद मन्सूर (वधूपिता, येमेन)

येमेनचे विद्यार्थी झाले वऱ्हाडी..

औरंगाबाद शहरात येमेन येथील 500 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत आहेत. त्यांना वऱ्हाडी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यांच्याशी असलेल्या समन्वयामुळे लग्नाला 150 हुन जास्त येमेनी उपस्थित होते. कोहिनूर लॉन्समध्ये शनिवारी हा सोहळा पार पडला. येमेनच्या नागरिकांनी यावेळी नृत्य केले.

दोघांनाच येमेनची परवानगी..

लग्नासाठी विशेष बाब म्हणून वधूपिता यांनी तिकिटे आरक्षित करण्यासाठी धावपळ केली. शेवटच्या क्षणी त्यांना कळाले कि, फक्त दोनच सदस्यांना भारतात जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर मुलीला घेऊन ते लग्नासाठी शहरात दाखल झाले. लग्नाला वधूसोबत केवळ वडीलांनाच उपस्थित राहता आले.

या लग्नाने आनंदित आहे. चांगली सून मिळाली. परंतु सध्या स्थितीत तलाक हा एक वादग्रस्त विषय बनला आहे. या काडीमोड झाल्यानंतर मुलीला वारेवर सोडून न देता तिची आर्थिक मदत व्हावी ही काळाची गरज आहे.
- मिन्हाज खान (वरपिता, औरंगाबाद)

हे ही वाचा..
त्या मुलीला यांनी दिला आधार..
हे कसे शक्‍य : पपईने बनविले लखपती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad's daughter-in-law becomes the daughter of Yemen