आता वाहन प्रशिक्षणासाठी मोजा ५,५०० रुपये!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद - स्पर्धेमुळे शुल्क कमी घ्यायचे आणि वाहन चालविण्याचे अर्धवट प्रशिक्षण द्यायचे हा प्रकार आता बंद होणार आहे. शहरातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी एकत्र येत यावर तोडगा काढला आहे. प्रशिक्षणार्थीला पूर्ण प्रशिक्षण द्यायचे आणि किमान ५ हजार ५०० रुपये शुल्क आकरायाचे, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी शनिवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद - स्पर्धेमुळे शुल्क कमी घ्यायचे आणि वाहन चालविण्याचे अर्धवट प्रशिक्षण द्यायचे हा प्रकार आता बंद होणार आहे. शहरातील ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी एकत्र येत यावर तोडगा काढला आहे. प्रशिक्षणार्थीला पूर्ण प्रशिक्षण द्यायचे आणि किमान ५ हजार ५०० रुपये शुल्क आकरायाचे, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी शनिवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत दिली.

शहरात ड्रायव्हिंग स्कूलची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. यातून अनेकांनी आपले शुल्क कमी  केले आहे. त्याचा परिमाण त्यांच्या प्रशिक्षणाच्या दर्जावर झाला आहे. यातून अर्धवट शिक्षण घेतलेले चालक तयार होतात आणि पुढे चालून अपघातांची संख्यासुद्धा वाढते. त्यामुळे शहरातील सगळ्या ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी एकत्र येत प्रशिक्षण शुल्क किमान ५ हजार ५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे शुल्क शनिवारपासून (ता. एक) लागू झाले आहे, अशी माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी देवेंद पांडे, किरण दळवी, संजय देशमुख, प्रकाश नागरे, रॅम तांदुळजे, राहील नवपुते यांनी दिली. दरम्यान, लवकरच औरंगाबाद जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यशाळेतून पुढे अाली संकल्पना 
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी एका संकेतस्थळाहून शहरातील ड्रायव्हिंग स्कूलचे क्रमांक घेत त्यांच्या शुल्काची चौकशी केली. त्यात प्रचंड तफावत आढळून आल्याने एक कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात त्यांनी स्वतः या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकांना चांगले चालक घडविण्याचे आवाहन केले. त्यानंतर संघटना स्थापन करण्याची संकल्पना पुढे अली आणि शुल्क निर्धारित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देवेंद पांडे यांनी सांगितले.

प्रशिक्षणार्थींनाच भरावे लागणार परवाना शुल्क
याव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थींना वाहनचालक परवान्याचे शुल्क हे आपल्याच खिशातून भरायचे आहे. दरम्यान, आठशे सीसीच्या सामान्य गाड्या शिकण्यासाठी ५ हजार ५०० रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. मात्र, त्यापेक्षा मोठे इंजिन असलेल्या गाड्या शिकण्यासाठी किती शुल्क मोजावे लागणार हे या मालकांनी ठरविलेले नाही. 

वर्ग ३० दिवसांचा; रपेट रोज ५ किमी 
अनेक संचालक नफा वाढविण्यासाठी ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीचा वर्ग चालवितात. यामध्ये कोणतीही विशेष माहिती दिली जात नाही. शिवाय दिवसाला पाच किलोमीटर प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. असे असताना हे काहीजण प्रशिक्षणार्थींना दोन किंवा तीन किलोमीटर गाडी चालवायला देतात. अनेकदा नियमावलीसुद्धा समजावून सांगण्यात येत नाही. मात्र, आता यात कसूर झाल्यास प्रशिक्षणार्थी संघटनेकडे किंवा थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकतात. 

Web Title: aurangabd news Vehicle Training