‘आधार’च्या सक्तीमुळे गणवेश अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपूर्वी गणवेश देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले तरी बॅंकेत खाते उघडणे व त्यासाठी करण्यात आलेली ‘आधार’ची सक्ती यामुळे पेच निर्माण झाला आहे. झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी बॅंकांना केले आहे; मात्र त्यालादेखील अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. 

महापालिकेच्या शहरात ७० हून अधिक मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळा असून, या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो; मात्र यंदा शासनाने गणवेशाची चारशे रुपयांची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी व आईच्या संयुक्त खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थांना बॅंकेत खाते उघडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र झिरो बॅलेन्सवर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यास बॅंका तयार नाहीत; तर चारशे रुपयांच्या गणवेशासाठी पाचशे रुपये खर्च करून खाते उघडण्याची पालकांची तयारी नाही. त्यात अनेक पालकांकडे व विद्यार्थ्यांकडे ‘आधार’ नाही. त्यामुळे गणवेश योजना यंदा अडचणीत आली आहे. १५ ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावेत, अशी मागणी वारंवार नगरसेवकांमधून होत असल्याने आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन झिरो बॅलेन्सवर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात यावेत, असे आवाहन केले होते. 

त्याचाही फायदा झालेला नाही. अद्याप निम्म्या विद्यार्थ्यांचे खातेच उघडलेले नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी १५ ऑगस्टपूर्वी गणवेश वाटप करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मंगळवारी (ता. आठ) पुन्हा एकदा आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: aurangbad news aadhar card