सावधान! रॅन्समवेअर करतोय डेटा हॅक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

औरंगाबाद - वॉनाक्राय रॅन्समवेअर व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर आता व्हायरस नव्या रूपात आला आहे. रशियन रॉलेट रॅन्समवेअर व्हायरसने आता संगणकावरील डेटा हॅक करून फाइल इन्क्रीप्ट केल्याचा प्रकार नुकताच औरंगाबादेत घडला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रदीप तांबे या विद्यार्थ्याला या व्हायरसचा चांगलाच फटका बसला आहे. 

व्हायरसने सुरवातीला संगणकावरील सी ड्राईव्हवरील ॲप्लिकेशन फाइल आणि युजर डेटा (डाऊनलोड फाईल्स, डॉक्‍यूमेंटस्‌) इन्क्रीप्ट केल्या.

वेब ब्राऊझिंग करताना चुकून ऑटो इन्स्टॉल झालेला रशियन रॉलेट रॅन्समवेअर या व्हायरसच्या कोडने अनुमतीशिवाय ब्राऊझिंग एक्‍सटेन्शन फाइल चेंज करणे, ब्राऊझिंग ॲक्‍टिव्हिटी जसे ईमेल, ट्‌विटर, फेसबुक यावर नजर ठेवणे याशिवाय आपण वापरत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत आलेल्या ॲण्टीव्हायरसची सर्व्हिस बंद केल्याने आपणाला काही करता न आल्याचे प्रदीपने सांगितले. ही माहिती संकलित केल्यानंतर व्हायरसकडून आपल्याला आपला डेटा हॅक झाल्याचे नोटिफिकेशन आले.

हा व्हायरस इतक्‍यावरच थांबत नाही तर आपला हॅक केलेला डेटा परत देण्यासाठी डेटाच्या व्हॅल्यूनुसार पैसा आकारला जातो आपणांसही पैशांची मागणी केल्याचे त्याने सांगितले. प्रदीप नुकताच विद्यापीठातून संगणक शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाला आहे.

काय काळजी घ्याल
हा व्हायरस प्रोग्रॅम ऑनलाइन ॲप्लिकेशनमधून सहजरीत्या संगणकावर येऊ शकतो म्हणून जी फाइल अथवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करावयाचे आहे, ते अधिकृत संकेतस्थळावरूनच घ्या. आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टीम आणि ॲण्टी मालवेअर पॅच अपडेटेड ठेवा.

हॅक प्रोसेस दरम्यान माझ्या संगणकाचे इंटरनेट स्लो होते, त्यामुळे सर्व फाईल्स हॅक करणे अवघड गेले. व्हायरसमुळे संगणकावरील इन्क्रीप्ट झालेल्या फाईल्स कोरियन आणि रशियन भाषेत होत्या. त्यामुळे समजण्यास अडचण आली.
प्रदीप तांबे, ॲप्स डेव्हलोपर.

Web Title: aurangbad news RandomWare Data Hack