फुलंब्रीत हैदोस घालणारे माकड अखेर पिंजऱ्यात बंद

नवनाथ इधाटे
मंगळवार, 20 मार्च 2018

त्या तरुणावर अद्याप घाटीत उपचार सुरुच
येथील यज्ञभूमी परिसरात राहणारा अशोक रमेश नागरे यास 8 मार्च रोजी एका माकडानी चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यास घाटी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल केले असता आता पर्यत चावा घेतलेल्या ठिकाणची  मुख्य रक्तवाहिनी तोडल्या गेल्याने दोन वेळा शस्त्र क्रिया करण्यात आली आहे. गेल्या  बारा दिवसा पासुन त्याच्यावर घाटी रुगण्लायात उपचार सुरुच आहे. त्यामुळे माकडाच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या रुग्णास शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

फुलंब्री : फुलंब्री शहरासह परिसरात  गेल्या महिनाभरापासुन माकडाने हैदाेस घालून सात ते आठ जणांना चावा घेत जखमी केले आहे. आतापर्यत सात - आठ जणांना चावणाऱ्या व हैदोस घालणाऱ्या पाच माकडाना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद करुन सोमवारी (ता.19) रोजी अभयारण्यात रवाना केले आहे.  

फुलंब्री शहरातील यज्ञभूमी परिसरातील अशोक नागरे या एका 25 वर्षीय तरुणास चावा घेऊन पायच्या टाचेचा लचका तोडण्याची घटना 8 मार्च रोजी घडली होती. तर यापूर्वी दीपक घुलारे, सोनाजी जाधव, अरहान पठाण, अमन शहा यांनाही माकडांनी चावा घेतला होता. या माकडाचा वनविभागाने त्वरीत बदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती. सदरील मागणीचे गांभीर्य लक्षात घेउन वनविभागाने तातडीने आतापर्यंत पाच सहा माकडांना जेरबंद केले आहे. माकडानी चावा घेतल्यास त्या रुग्णाला वनविभागानी अर्थीक मदत करण्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी जनतेतुन होऊ लागली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी लागले कामाला
फुलंब्री शहरात धुमाकुळ घालणाऱ्या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी वनरिक्षेत्र शिवाजी दहिवाल, वनरक्षक अण्णा वाघ, संजय नजन आदींनी माकडमित्र समाधान रा. अंभई  यांच्या मदतीने 11 मार्च रोजी चार, तर 19 मार्च रोजी एका लाल माकडाला पिंजरा टाकून जेरबंद केले आहे.  सदर माकडाची गेल्या महिनाभरात फुलंब्रीत मोटी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे माकड जेरबंद करतांना बघ्यानी मोठीगर्दी केली होती.

माकड चावल्यास नुकसान भरपाईची तरतूद नाही वनपरिक्षेत्र अधिकारी - शिवाजी दहिवाल
माकडाच्या हल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटना मागील काही दिवसापासून सुरू आहेत. वन्यप्राण्यानी शेतकऱ्यांच्या पिकाचे किवा गाई , म्हसी, बैलासह काही  नुकसान केल्यास किवा एखाद्या प्राण्यानी मनुष्यावर हल्ला केल्यास त्यास वनविभागामार्फ़त नुकसान भरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे हल्यात मृत्यु पावल्यास आठ लाख रुपायापर्यत नुकसान भरपाई संबंधीत मयताच्या वारसाना दिली जाते. परंतु  माकडानी चावा घेऊन जखमी केल्यास किंवा कोणी माकडाच्या हल्यात मृत्यु पावल्यास  वनविभागाकडे  नुकसान देण्याची तरतुदच नसल्याचे  वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहीवाल यांनी सांगितले.

त्या तरुणावर अद्याप घाटीत उपचार सुरुच
येथील यज्ञभूमी परिसरात राहणारा अशोक रमेश नागरे यास 8 मार्च रोजी एका माकडानी चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यास घाटी रुग्णाल्यात उपचारासाठी दाखल केले असता आता पर्यत चावा घेतलेल्या ठिकाणची  मुख्य रक्तवाहिनी तोडल्या गेल्याने दोन वेळा शस्त्र क्रिया करण्यात आली आहे. गेल्या  बारा दिवसा पासुन त्याच्यावर घाटी रुगण्लायात उपचार सुरुच आहे. त्यामुळे माकडाच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या रुग्णास शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Aurnagabad news monkey in phulambri

टॅग्स