मराठवाड्यात दीडशे दिवसात 361 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेखलाल शेख
बुधवार, 31 मे 2017

मदतीसाठी 231 प्रकरणे पात्र, 44 अपात्र, 86 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित

औरंगाबादः मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी, गारपीट आणि डोक्‍यावरील वाढत जाणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ होत आहे. 1 जानेवारी ते 28 मे 2017 दरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात तब्बल 361 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. यामध्ये आर्थिक मदतीसाठी प्रशासकीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे 231 प्रकरणे पात्र ठरली आहे तर 86 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाला यामध्ये एक लाखांची मदत केली जाते.

मागील चार ते पाच वर्षापासून मराठवाड्यात कमी पर्यजन्यमान होत असल्याने विहरी कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे हजारो हेक्‍टर जमीन कोरडवाहु झाली आहे. कित्येक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळणे अवघड झाल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत. बहुतांश शेतकरी कर्जबाजारी झाल्याने त्यांनी मृत्युला कवटाळले आहे. मराठवाड्यात 1 जानेवारी ते 28 मे दरम्यान 361 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंबंधी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने यातील 231 प्रकरणे पात्र ठरविले आहेत तर 44 प्रकरणे अपात्र घोषित केले. तसेच 86 प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या तपासणीसाठी प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे
जिल्हे................प्रकरणे....................पात्र......................अपात्र................प्रलंबित
औरंगाबाद.............50.....................28......................12....................10
जालना.................32.....................26......................00....................06
परभणी.................43.....................27.......................06....................10
हिंगोली.................22......................11.......................02....................09
नांदेड...................63.....................43........................07...................13
बीड....................68......................47........................02....................19
लातुर...................28......................15.........................04...................09
उस्मानाबाद..............55.....................34..........................11...................10
एकूण...................361...................231.........................44..................86

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: aurngabad news 361 farmer suicide in marathawada