
औसा तालुक्यातील ग्रामपंचायत सारपंचपदाची सोडत शुक्रवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली यावेळी आरक्षण सोडत काढण्यासाठी एका लहान मुलाला प्रशासनाने सभागृहात आणले होते.
औसा (लातूर): औसा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत शुक्रवारी (ता.२९) ला पार पडली. सोडतीची चिट्ठी काढण्यासाठी एक लहान मुलगा प्रशासनाने उभा केला होता. सुरुवातीला चिट्ठी काढणे खूप मनाचे काम असल्याच्या अविर्भावात असणाऱ्या या मुलांच्या चेऱ्यावर थोड्याच वेळानंतर 'उगीच अडकून पडलो' अशी भावना उमटत होती.
एकीकडे सभागृहात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला तो कोणती चिट्ठी काढतो याची उत्कंठा होती तर या मुलाला भूक लागल्याने नाविलाजास्तव त्याला सभागृहात थांबणे गरजेचे असल्याचे जाणवत होते. हा मुलगा वारंवार 'आता मी जाऊ का' हाच प्रश्न जवळ उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना विचारात होता तर अधिकारी त्याला अजून थोडावेळ थांब म्हणून विनवत होते. मात्र कावरा बावरा चेहरा करून तो बसून होता.
'राज्य सरकार विरोधात ७ फेब्रुवारी पासून एल्गार मेळावा'
औसा तालुक्यातील ग्रामपंचायत सारपंचपदाची सोडत शुक्रवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पार पडली यावेळी आरक्षण सोडत काढण्यासाठी एका लहान मुलाला प्रशासनाने सभागृहात आणले होते. प्रथम या मुलाला बरणी मधून चिट्ठी काढण्यासाठी बोलवत असल्याचे सांगण्यात आले. आपल्याला चिट्ठी काढायला बोलावले असल्याच्या आनंदात तो सभागृहात आला. सुरवातीच्या चिट्ठया त्याने आनंदाने काढल्याही. सर्व लोक आपल्याकडेच पाहत असल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उपस्थितांना दिसूनही आला.
मात्र जसा जसा वेळ लागू लागला तसा तसा तो चुळबुळ करू लागला. चिठया बरणीत टाकल्या की त्याला स्टेजवर बोलावले जायचे आणि पुन्हा त्याला एका बाजूला बसविले जायचे. कंटाळून त्याने जवळ असलेल्या अधिकाऱ्याला विचारले 'मी आता जाऊ का? मला भूक लागली आहे' कावऱ्या बावाऱ्या चेहऱ्याकडे पाहून अधिकाऱ्यांनाही हसू आवरेना. झालं थोडं थांब म्हणत अधिकाऱ्यांनी त्याला थांबविले.
प्रेरणादायी! अंध विद्यार्थ्याची शिक्षणासाठीची प्रबळ इच्छाशक्ती ठरतेय कौतुकाचा...
ही चिट्ठी आपण कशासाठी काढतोय? यातून काय साध्य होणार आहे? निघणारी चिट्ठी वाचून लोक एकमेकांच्या हातात हात देऊन अभिनंदन का करीत आहेत याची पुसटशी कल्पना नसणाऱ्या या मुलाला जेव्हा जाणीव होऊ लागली की आपले "कीर्तनात घोंगडे" अडकले आहे. तेव्हा त्याची चुळबुळ अधिकच वाढत गेली. या मुलाची बेचैनी अनेकांनी पहिली आणि गलातल्या गालात हसत त्याला दादही दिली.
(edited by- pramod sarawale)