औसा तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

औसा (जि. लातूर) - गुळखेडा (ता. औसा) येथील शेतकरी शिवराज विठोबा लांडगे (वय 68) यांनी सोमवारी (ता. 12) सकाळी सातच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी धिराबाई लांडगे यांच्या नावे 2 हेक्‍टर 26 आर जमीन असून, बॅंकेचे 2 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या बोजामुळे शिवराज लांडगे काही दिवसांनी निराश होते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तलाठी अंबिका जोगदंड यांनी पंचनामा केला असून, भादा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.
Web Title: ausa news marathwada news farmer suicide