ऑटोमोबाईलवरही इंधन दरवाढीचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - इंधनाच्या सुरू असलेल्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटीसह सरकारच्या विविध नियमांमुळे हैराण झालेल्या बाजारपेठा उभारी घेण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून धडपड करीत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रही नोटाबंदीपासून विस्कळित झाले आहे. 

गेल्या चार वर्षांपूर्वी गणेशोत्सवात एका शोरूममधून २५ ते ३० चारचाकी विक्री व्हायच्या. सद्यःस्थितीत दहाच वाहनांची विक्री होत आहे. इंधनाची सुरू असलेली ही सततची दरवाढ अशीच राहिल्यास चारचाकी वाहनांच्या किमती पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याची शक्‍यता विक्रेत्यांतर्फे वर्तविली जात आहे. 

श्रावण संपल्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवापासून वाहन खरेदीचा ओघ सुरू होतो. मात्र, नोटाबंदीनंतर वाहन खरेदीला ब्रेक लागला. गेल्या वर्षीही गणेशोत्सवात विक्रीवर परिणाम दिसून आला होता. एवढेच नाही, तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यालाही विक्री ३० ते ४० टक्‍क्‍यांनी कमी झाली होती. यंदाही इंधनदरवाढीमुळे ५० टक्‍क्‍यांनी विक्रीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. यामुळे प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी वाहन कंपन्यांना विविध योजना जाहीर कराव्या लागत आहेत. 

दसरा इंधन दरावर अवलंबून 
औरंगाबादेत शनिवारी (ता. १५) पेट्रोल ९०.१५, तर डिझेल ७९.२२ रुपयांनी विक्री झाले. ही दरवाढ अशीच राहिल्यास वाहतूक खर्च, वाहन कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल. यामुळे यंदाच्या दसरा-दिवाळी सणाची ऑटोमोबाईल क्षेत्राची उलाढाल इंधनाच्या दरावर अवलंबून राहणार असल्याचे चारचाकी वाहन विक्रेते विकास वाळवेकर यांनी सांगितले.

इंधनदरवाढीमुळे मध्यमवर्गीय चारचाकी वाहन घेण्याबाबत आता नकारात्मक विचार करीत आहेत. डिझेलचे दर पेट्रोलच्या बरोबरीत गेल्याने चारचाकीच्या विक्रीवर परिणाम दिसून येत आहे. पुढील सण-उत्सावांतील उलाढाली यावरच अवलंबून राहणार आहेत.
- विकास वाळवेकर, सरव्यवस्थापक, धूत हृुंदाई मोटर्स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Automobile Fuel Rate Effect