औट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब

आदित्य वाघमारे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

औरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) सुरू करण्यात आली आहे.

औरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. या बोगद्यासाठी भूमी अधिग्रहण प्रक्रिया भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-काश्‍मिरातील पीर पंजाल बोगदा (9.2 किमी) हा सध्या देशातील सर्वांत लांब आहे. याहीपेक्षा अधिक लांबी असलेला बोगदा अस्तित्वात येण्याकडे केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. औरंगाबाद-धुळे मार्गावर असलेल्या औट्रम घाटात 14.2 (7.1 किमीची एक बाजू) किलोमीटर लांबीच्या बोगद्याची उभारणी केली जाणार आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा हा भाग असून, या कामासाठी जागेच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी आवश्‍यक कारवाई हाती घेण्यात आली असून, राष्ट्रीय महामार्ग 1956 कायद्यानुसार नियमाप्रमाणे या जागेचे "थ्री ए' करण्यात आले आहे.

भूमी अधिग्रहणासाठी ही पहिली प्रक्रिया मानली जाते. यानंतर संयुक्‍त मोजणी, जागा अंतिम करून प्रत्यक्षात मोबदला देण्यास सुरवात होईल. या कामासाठी 125 हेक्‍टर जमीन सरकार ताब्यात घेणार असून, आगामी एक ते दोन महिन्यांत ही प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.

बोगदा एका नजरेत
- लांबी : 14.2 किमी (7.1 किमी एक बाजू)
- लेन : 3 लेन एक बाजूला
- किंमत : रुपये 5800 कोटी
- कालावधी : सात वर्षे
- मजले : 2
- आपत्कालीन मार्ग : 2 लेन

औट्रम घाटात बोगदा उभारण्यासाठी जागेची अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी 125 हेक्‍टर जागा लागणार असून, बोगद्याची लांबी 14 किलोमीटर राहणार आहे.
- अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय

Web Title: Autram Ghat Tunnel is Big